Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते.
उत्तर
१. विज्ञानशाखांमध्ये ज्ञानाच्या सत्यतेची पडताळणी करण्याकरता प्रायोगिक पद्धतीचा उपयोग केला जातो.
२. याच्या आधारे विविध घटनांसंबंधित सार्वत्रिक व सार्वकालिक नियम मांडले जातात, की जे पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते.
३. मात्र, प्रायोगिक पद्धतीने प्रयोग व निरीक्षण करून इतिहास संशोधन करणे शक्य नाही. या सर्व घटना घडून गेलेल्या असल्याने त्या घटनांचे प्रत्यक्ष निरीक्षण आपण केलेले नसते.
४. शिवाय, या घटनांची पुनरावृत्ती करता येणेदेखील शक्य नसते. त्यामुळे, त्यासंबंधित सार्वत्रिक व सार्वकालिक नियम मांडणे किंवा ते सिद्ध करता येणेही शक्य नसते.
म्हणूनच, विज्ञान शाखांप्रमाणे इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती वापरणे शक्य नाही.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
टिपा लिहा.
इतिहासकार
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली, असे सद्यपरिस्थितीत म्हणता येईल. सुमेर राज्यात होऊन गेलेले राजे, यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे ४५०० वर्षांपूर्वी सुमेर मधील दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवला आहे. |
१. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा कोणत्या संस्कृतीत झाली?
२. सर्वाधिक प्राचीन शिलालेख कोणत्या संग्रहालयात आहे?
३. शिलालेख हे इतिहासाचे साधन कसे ठरते यावर तुमचे मत व्यक्त करा.