Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा:
सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.
टिप्पणी लिखिए
उत्तर १
- विसाव्या-एकविसाव्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयीकरण झाले आहे.
- सर्वच सामन्यांचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते. ज्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी; तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात.
- निवृत्त खेळाडूंना समालोचनासाठी वाहिन्यांवर बोलावले जाते.
- सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग येतो. त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात. या कारणांमुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.
shaalaa.com
उत्तर २
१. विसाव्या व एकविसाव्या शतकांत विविध खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण झालेले आहे. जगभर खेळल्या जाणाऱ्या खेळांच्या सामन्यांचे दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाचवेळी थेट प्रक्षेपण केले जाते. त्यामुळे, ज्या देशांचा या खेळांमध्ये काही सहभाग नाही, तेथील प्रेक्षकही या खेळाचा आनंद लुटतात.
२. याशिवाय, हौशी खेळाडू शिकण्याकरता आणि प्रेक्षक मनोरंजनाकरता असे सामने पाहतात.
३. या सामन्यांच्या वेळी प्रेक्षकांना सामने समजावून देण्याकरता निवृत्त खेळाडूदेखील तेथे उपस्थित असतात.
४. खेळांच्या या प्रसिद्धीमुळे विविध कंपन्या जाहिरातीची संधी म्हणून या सामन्यांकडे पाहतात. वरील सर्व गोष्टींमुळे सध्याच्या काळात खेळांचे अर्थकारण बदलले आहे.
shaalaa.com
खेळांचे महत्त्व
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?