Advertisements
Advertisements
प्रश्न
राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर १
राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-
- निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे, हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते.
- प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरण असते.
- आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करीत असतो.
- निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो; तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात.
- राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात.
उत्तर २
राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर राजकीय सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणार्या लोकांचा गट होय.
राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
१. सत्ता मिळवणे
निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच राजकीय पक्षांचा मुख्य हेतू असतो.
२. विचारसरणीचा आधार
प्रत्येक राजकीय पक्षाचे काही ठरावीक विचार, धोरणे असतात. सार्वजनिक प्रश्नांसंबंधीही त्यांची एक विशिष्ट भूमिका असते. यातून त्या पक्षाची ठरावीक विचारसरणी तयार होते.
३. पक्ष कार्यक्रम
राजकीय पक्ष आपली ठरावीक विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. त्यांची अंमलबजावणी सत्ता संपादन केल्यानंतर केली जाते.
४. सरकार स्थापन करणे
निवडणुकीत बहुमत मिळवणारा राजकीय पक्ष सरकार स्थापन करतो, तर ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात.
५. शासन व जनता यांच्यातील दुवा
राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या व गार्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात, तर शासन पक्षांच्या माध्यमातून आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते. अशाप्रकारे, राजकीय पक्ष हे शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.