हिंदी

रामकृष्ण मिशन ने केलेले कार्य लिहा. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

रामकृष्ण मिशन ने केलेले कार्य लिहा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

स्वामी विवेकानंदांनी इसवी सन १८९७ मध्ये 'रामकृष्ण मिशन' या संस्थेची स्थापना केली. लोकसेवेला प्राधान्य देऊन रामकृष्ण मिशन ने पुढील कार्य केले -

(१) दुष्काळग्रस्तांना मदत केली.

(२) आजारी लोकांना औषधोपचाराची सुविधा दिली.

(३) समाजातील दीनदुबळ्यांची सेवा केली.

(४) स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री-शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या. स्त्री-शिक्षणाचा आग्रह धरला.

(५) आध्यात्मिक उन्नतीला महत्त्व देऊन समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला.

(६) 'उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका' हा संदेश विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन द्वारे तरुणांना दिला.

अशा रितीने आत्मिक उन्नती, स्त्री-शिक्षण, दीन-दुबळ्यांचा उद्धार अशा विविध प्रकारच्या कामांतून रामकृष्ण मिशनने समाजोपयोगी कामे केली.

shaalaa.com
धार्मिक सुधारणा चळवळी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा - स्वाध्याय [पृष्ठ ३७]

APPEARS IN

बालभारती History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
अध्याय 5 भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
स्वाध्याय | Q ४.२ | पृष्ठ ३७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×