Advertisements
Advertisements
प्रश्न
रामकृष्ण मिशन ने केलेले कार्य लिहा.
उत्तर
स्वामी विवेकानंदांनी इसवी सन १८९७ मध्ये 'रामकृष्ण मिशन' या संस्थेची स्थापना केली. लोकसेवेला प्राधान्य देऊन रामकृष्ण मिशन ने पुढील कार्य केले -
(१) दुष्काळग्रस्तांना मदत केली.
(२) आजारी लोकांना औषधोपचाराची सुविधा दिली.
(३) समाजातील दीनदुबळ्यांची सेवा केली.
(४) स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री-शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या. स्त्री-शिक्षणाचा आग्रह धरला.
(५) आध्यात्मिक उन्नतीला महत्त्व देऊन समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला.
(६) 'उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका' हा संदेश विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन द्वारे तरुणांना दिला.
अशा रितीने आत्मिक उन्नती, स्त्री-शिक्षण, दीन-दुबळ्यांचा उद्धार अशा विविध प्रकारच्या कामांतून रामकृष्ण मिशनने समाजोपयोगी कामे केली.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आर्य समाजाची स्थापना ______ यांनी केली.
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
'अ' गट |
'ब' गट |
१. ब्राह्मो समाज |
- राजा राममोहन रॉय |
२. सत्यशोधक समाज |
- महात्मा जोतीराव फुले |
३. परमहंस सभा |
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे |
४. रामकृष्ण मिशन |
- स्वामी विवेकानंद |
टीप लिहा.
प्रार्थना समाज
टीप लिहा.
सत्यशोधक समाज