हिंदी

राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

राष्‍ट्रीय उत्‍पन्न हा स्‍थूल अर्थशास्‍त्राचा एक महत्‍त्‍वाचा अभ्‍यासविषय आहे. देशाचे एकूण उत्‍पन्न म्‍हणजे राष्‍ट्रीय उत्‍पन्न होय. खऱ्या अर्थाने, राष्‍ट्रीय उत्‍पन्न म्‍हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्‍पादित होणाऱ्या वस्‍तू व सेवांचा प्रवाह होय. राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी खालीलप्रमाणे आहेत:

  1. घसारा -  भांडवली वस्तूंच्या वापरामुळे भांडवली वस्तूंची जी झीज होते त्याचे मापन करणे अवघड असते. उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज म्हणजे घसारा होय. भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज भांडवली मालमत्तेचे तांत्रिक आयुष्य, भांडवली वस्तूंचा वापर, वस्तूचे स्वरूप, वस्तूची नियमित आणि काळजीपूर्वक देखभाल इ. अनेक गोष्टींवर अवलंबून असते. भांडवली वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असल्यामुळे घसारा मोजण्यासाठी एकसमान, सामाईक, स्वीकार्य असे प्रमाणदर अस्तित्वात नाहीत. घसारा मोजण्यासाठी बऱ्याच गोष्टी गृहीत धराव्या लागतात. त्यामुळे घसाऱ्याची अचूक रक्कम उपलब्ध होणे अवघड असते.
  2. निरक्षरता आणि अज्ञान - विकसनशील देशांत बहुतांश छोटे उत्पादक निरक्षर आणि अज्ञानी असतात. त्यामुळे ते आपल्या उत्पादनासंबंधीच्या नोंदी ठेवू शकत नाहीत. म्हणून स्वत:च्या उत्पादनाची किंवा उत्पादनमूल्याची माहिती देऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांच्या उत्पादनाचे किंवा अर्जित उत्पन्नाचे अंदाज व्यक्त केले जातात.
  3. मालाच्या साठ्याचे मूल्य -  उत्पादकाकडे कच्चा माल, मध्यम वस्तू, अर्धसिद्ध वस्तू, अंतिम वस्तू यांचा असणारा साठा म्हणजे मालसाठा होय. मालसाठ्याच्या मूल्यात होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक बदलांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. मालसाठ्याच्या मूल्यमापनात झालेली चूक अंतिम वस्तूच्या मूल्यात बदल करू शकते. म्हणून मालसाठ्याचे मूल्यमापन काळजीपूर्वक करावे लागते.
  4. अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी - विकसनशील देशांत उत्पादन आणि खर्चाविषयीची पुरेशी आणि अचूक माहिती उपलब्ध नसते. शेती, मत्स्य व्यवसाय,पशुपालन, वनउत्पादने, किरकोळव्यावसायिक, बांधकामावरील कामगार, छोटे व्यावसायिक इ. च्या उत्पन्नासंबंधीची अचूक व विश्वासार्ह माहिती उपलब्ध नसते. उत्पन्न पद्धतीनेराष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अनर्जित उत्पन्नासंबंधीची माहिती, ग्रामीण व शहरी भागातील उपभोग आणि गुंतवणुकीचा खर्च यांची देखील माहिती उपलब्ध नसते. त्यामुळेराष्ट्रीय उत्पन्नाची नेमकी आकडेवारीच उपलब्ध होत नाही.
  5. व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव - विकसनशील देशात व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव असल्याने उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अडचणी येतात. उदा., विकसनशील देशात शेतकरी शेती या प्रमुख व्यवसायाबरोबरच दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, कपडे शिवणे इ. इतर व्यवसायदेखील करतात. इतर व्यवसायांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना दिली जात नाही. त्यामुळे देशाचे खरे उत्पन्न समजत नाही.
  6. अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व - भारतासारख्या विकसनशील देशात मोठ्या प्रमाणावर अमौद्रिक क्षेत्र अस्तित्वात आहे. शेती व्यवसाय अजूनही उदरनिर्वाहासाठी केला जातो. शेती उत्पादनाचा बराच मोठा भाग वैयक्तिक उपभोगासाठी वापरला जातो. तसेच उत्पादनाच्या काही भागाचा इतर वस्तू आणि सेवांच्या बदल्यात विनिमय केला जातो. अशा उत्पादनाचे आणि उपभोगाचे मापन राष्ट्रीय उत्पन्नात केले जाऊ शकत नाही.
  7. दुहेरी गणनेची समस्या - राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारी सर्वांत मोठी अडचण म्हणजे दुहेरी गणना. एखादी वस्तू मध्यम आहे की अंतिम आहे हे निश्चित करणे अवघड असल्यामुळे बऱ्याच वस्तूंची गणना दोनदा होण्याची भीती असते. त्यामुळे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न अनेक पटींनी अधिक दिसते. उदा., बेकरीत जे पीठ वापरले जाते त्याला मध्यम वस्तू म्हणून संबोधले जाते. पण तेच पीठ जर कुटुंबाकडून वापरले गेले तर ते अंतिम वस्तू म्हणून गणले जाते.
  8. भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा -  मालमत्ताधारकांना मागणीतील बदलामुळे किंवा बाजारभावात वाढ झाल्यामुळे जो भांडवली लाभ होतो किंवा बाजारभावात घट झाल्यामुळे जो भांडवली तोटा होतो, त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. कारण चालू आर्थिक व्यवहारांमुळे हे बदल घडून येत नाहीत.
shaalaa.com
राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील अडचणी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×