हिंदी

राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

स्पष्ट कीजिए

उत्तर

  1. स्थूल आर्थिक संकल्पना: एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. म्हणूनच ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे.
  2. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य: दुहेरी गणना टाळण्यासाठी  फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेत उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किंमती विचारात घेऊ नयेत. उदा., शर्टाचे मूल्‍य निश्चित करताना कापसाच्या मूल्‍याचा विचार केला जात नाही. कारण ते शर्टच्या किंमतीत आधीपासूनच समाविष्‍ट केलेले असते.
  3. निव्वळ समग्र मूल्‍य: राष्‍ट्रीय उत्‍पन्नात उत्‍पादित वस्‍तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्‍याचा समावेश केला जातो. यात घसारा निधीचा समावेश केला जात नाही. उदा. भांडवली वस्‍तूंची होणारी झीज.
  4. विदेशी निव्वळ उत्‍पन्न: राष्‍ट्रीय उत्‍पन्नात परदेशांतून मिळणाऱ्या निव्वळ उत्‍पन्नाचा समावेश केला जातो. निर्यात मूल्‍य आणि आयात मूल्‍य (X−M) आणि परदेशातून मिळालेले उत्‍पन्न आणि परदेशाला दिलेली देणी (R−P) यांच्यातील निव्वळ फरक विचारात घेतला जातो.
  5. आर्थिक वर्ष: राष्‍ट्रीय उत्‍पन्न नेहमी कालावधीच्या संदर्भात व्यक्‍त केले जाते. भारतात आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे आहे.
  6. प्रवाही संकल्‍पना: राष्‍ट्रीय उत्‍पन्न ही एक प्रवाही संकल्‍पना असून एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्‍थेत उत्‍पादित वस्‍तू व सेवांचा प्रवाह दर्शविते.
  7. पैशांत व्यक्‍त केलेले मूल्‍य: राष्‍ट्रीय उत्‍पन्न नेहमी पैशांत व्यक्‍त केले जाते. ज्‍या वस्‍तू आणि सेवांना पैशाच्या स्‍वरूपातील मूल्‍य/विनिमय मूल्‍य असते. अशाच वस्‍तू व सेवांचा समावेश राष्‍ट्रीय उत्‍पन्नात केला जातो.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×