Advertisements
Advertisements
प्रश्न
सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा.
दीर्घउत्तर
उत्तर
- लेम्युर प्राणी दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानवाचे पूर्वज विकसित झाले. पुढच्या 7 कोटी वर्षांत निरनिराळे माकड सदृश प्राणी निर्माण होत गेले.
- सुमारे 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील या माकड सदृश प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यापासून कपि (एप) आणि मानव अशा दोन गटांची स्वतंत्र उत्क्रांती झाली.
- मेंदूच्या आकारमानात वाढ, हाताचा अंगठा आणि पंजा यांच्यात सुधारणा, दोन पायांवर चालणे, पळणे या प्रकारचे बदल होत होत मानवसदृश प्राणी निर्माण होऊ लागले.
- त्या नंतरच्या काळात हे कपिसारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशिया पोहोचले. त्यांच्यापासून गिबन आणि ओरँगउटान निर्माण झाले.
- उरलेले हे कपि सदृश प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती मानवसदृश प्राणी निर्माण करण्याकडे झुकली. एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आल्यामुळे त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास झाला. त्यामुळे ते ताठ उभे राहू लागले मागचे पाय शरीर तोलू लागले आणि त्यामुळे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले.
- सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे, पहिले मानवसदृश प्राणी अस्तित्वात आले.
- त्यानंतर आदिमानवाच्या निरनिराळ्या जीवाश्मांवरून मानवी उत्क्रांतीचा आराखडा तयार झाला.
- आफ्रिकेतील रामापिथिकस हा एप, पहिला मानवसदृश प्राणी म्हणून नोंद झाली आहे. 'रामापिथिकस ऑस्ट्रॅलोपिथिकस निॲन्डरथॉल मानव क्रो मॅन्या मानव असे मानवी उत्क्रांतीमधील महत्त्वाचे टप्पे आहेत.
- 'निॲन्डरथॉल मानव' हा पहिला 'बुद्धिमान मानव' म्हणजेच होमो सॅपियन म्हटला जातो. यानंतरच्या उत्क्रांतीमध्ये जीवशास्त्रीय बदल कमी झाले; मात्र सांस्कृतिक बदल झाले.
- बुद्धिमान मानवाने शेती, पशुपालन, वसाहती वसवणे, कला, इतिहास, शास्त्रे अशा इतर प्राण्यांना जमणार नाहीत त्या बाबी निर्माण केल्या. 200 वर्षांपूर्वी मानवाने औदयोगिक समाजाची सुरुवात केली.
shaalaa.com
मानवी उत्क्रांती (Human Evolution)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?