Advertisements
Advertisements
प्रश्न
शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले?
विस्तार में उत्तर
उत्तर
- महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहाने इ.स. १६६० मध्ये सिद्दी जौहर या कर्नुल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले.
- त्याला 'सलाबतखान' असा किताब दिला. सिद्दी जौहरच्या मदतीस रुस्तुम-इ-जमान, बाजी घोरपडे आणि अफजलखानाचा मुलगा फाजलखान हेही होते. या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला.
- सुमारे पाच महिने सिद्दीच्या सैनिकांचा पन्हाळ्यास वेढा पडला होता. वेढ्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते. नेतोजी पालकरने बाहेरून सिद्दीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचे सैन्य थोडे असल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही.
- सिद्दी वेढा उठवेल, अशी चिन्हे दिसत नव्हती. म्हणून महाराजांनी सिद्दीशी बोलणी सुरू केली. त्यामुळे सिद्दीने पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली.
- या शिथिलतेचा फायदा महाराजांना झाला. या प्रसंगी गडावरील शिवा काशिद या बहादूर तरुणाने पुढाकार घेतला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. शिवाजी महाराजांची वेषभूषा करून तो पालखीत बसला. पालखी राजदिंडी दरवाज्यातून बाहेर पडली. सिद्दीच्या सैन्याने ती पालखी पकडली. प्रसंग बाका होता. शिवा काशिदने या प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान केले.
- दरम्यान, शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?