Advertisements
Advertisements
प्रश्न
शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते, हे कोणत्या बाबीवरून दिसून येते?
विस्तार में उत्तर
उत्तर
शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते, हे खालील बाबींवरून दिसून येते.
- शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता, तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त असलेल्या सोई-सवलती शिवाजी महाराज तशाच चालू ठेवत. मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये असा सैनिकांसाठी सक्त नियम होता.
- शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सरदार व अधिकारी होते:
- सिद्दी इब्राहिम हे त्यांच्या सैन्यातील एक विश्वासू सेवक होते.
- सिद्दी हिलाल हे त्यांच्या सैन्यात एक महत्त्वाचे सरदार होते.
- दौलतखान हे स्वराज्याच्या आरमारातील (नौदल) एक महत्त्वाचे अधिकारी होते.
- कुरानची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात येई. शिवरायांच्या स्वराज्यात सर्व जाती-धर्मांचे विश्वासू सेवक होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?