Advertisements
Advertisements
प्रश्न
शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा.
दीर्घउत्तर
उत्तर
- शिवरायांनी सैनिकांना जहागीर देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था केली.
- मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांचा मानसन्मान केला.
- लढाईत जे सैनिक मृत्यू पावत, त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाची तसेच जखमी सैनिकांची काळजी घेतली.
- लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना त्यांनी चांगली वागणूक दिली. एकंदर शिवरायांच्या लष्कराची शिस्त कडक होती.
अशाप्रकारे, शिवाजी महाराजांनी सैन्याबाबतच्या धोरणात शिस्त, प्रामाणिकपणा आणि मानवता या तत्त्वांचे पालन केले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?