Advertisements
Advertisements
प्रश्न
शंकूछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी व 6 सेमी आहेत व त्याची उंची 6 सेमी असल्यास पुढील किमती काढा. (π = 3.14)
(1) शंकूछेदाचे वक्रपृष्ठफळ
(2) शंकूछेदाचे एकूण पृष्ठफळ
(3) शंकूछेदाचे घनफळ
उत्तर
दिलेले:
त्रिज्या (r1) = 14 सेमी आणि
(r2) = 6 सेमी,
उंची (h) = 6 सेमी
उकल:
शंकूछेदाची तिरकस उंची (l) = `sqrt(h^2 + (r_1 - r_2)^2)`
= `sqrt(6^2 + (14 - 6)^2)`
= `sqrt(6^2 + 8^2)`
= `sqrt(36 + 64) = sqrt100`
= 10 सेमी
(1) शंकूछेदाचे वक्रपृष्ठफळ = πl(r1 + r2)
= 3.14 × 10 (14 + 6)
= 3.14 × 10 × 20
= 628 सेमी2
∴ शंकूछेदाचे वक्रपृष्ठफळ 628 सेमी2 आहे.
(2) शंकूछेदाचे एकूण पृष्ठफळ
= `pil(r_1 + r_2) + pir_1^2 + pir_2^2`
= 628 + 3.14 × (14)2 + 3.14 × (6)2
= 628 + 3.14 × 196 + 3.14 × 36
= 628 + 3.14 (196 + 36)
= 628 + 3.14 × 232
= 628 + 728.48
= 1356.48 सेमी2
∴ शंकूछेदाचे एकूण पृष्ठफळ 1356.48 सेमी2 आहे.
(3) शंकूछेदाचे घनफळ
= `1/3pih(r_1^2 + r_2^2 + r_1 xx r_2)`
= `1/3 xx 3.14 xx 6(14^2 + 6^2 + 14 xx 6)`
= 3.14 × 2(196 + 36 + 84)
= 3.14 × 2 × 316
= 1984.48 सेमी3
∴ शंकूछेदाचे घनफळ 1984.48 सेमी3 आहे.