Advertisements
Advertisements
प्रश्न
संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना कोणती भूमिका बजावते?
संक्षेप में उत्तर
उत्तर
संपूर्ण जगात शांतता व सुरक्षितता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रांची शांतीसेना पुढीलप्रमाणे भूमिका बजावते.
- संर्षग्रस्त प्रदेशांमध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेचे शांततारक्षक संघर्षग्रस्त प्रदेशांत विविध उपक्रमांद्वारे शांततेस पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे काम करतात.
- तसेच, अशा ठिकाणी सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांततेच्या बांधणीकरता शांतिसेनेकडून साहाय्य केले जाते.
- याचाच अर्थ संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना राष्ट्रांतील संघर्षाला प्रतिबंध करते. यासाठी मध्यस्थीदेखील करते, प्रत्यक्ष शांतता प्रस्थापित करून तिच्या बांधणी बरोबरच शांतता रक्षणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे काम शांतिसेना करते.
shaalaa.com
संयुक्त राष्ट्रे आणि भारत
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?