Advertisements
Advertisements
प्रश्न
संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या स्थापनेची कारणे लिहा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
- विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या दोन्ही महायुदधांचे दुष्परिणाम लक्षात घेता जागतिक शांततेसाठी एक यंत्रणा असावी या हेतूने पहिल्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली.
- पहिल्या महायुद्धानंतर स्थापन करण्यात आलेला राष्ट्रसंघ जागतिक शांतता प्रस्थापित करण्यात फारसा यशस्वी ठरल नाही. दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बच्या वापरानंतर मात्र अशी विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत याची जाणीव सर्व देशांना झाली. यातूनच जगात शांतता प्रस्थापित करणे ही सर्व राष्ट्रांची जबाबदारी आहे असा विचारही पुढे आला.
- अशी जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना दुसरे महायुद्ध संपल्यानंतर करण्यात आली.
shaalaa.com
संयुक्त राष्ट्रे
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?