हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

स्पष्ट करा. कार्बनच्या विविध अपरूपांचे उपयोग - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्पष्ट करा.

कार्बनच्या विविध अपरूपांचे उपयोग

संक्षेप में उत्तर

उत्तर

कार्बनच्या हिरा, ग्रॅफाइट, फुलरिन, कोल, कोक अशा विविध अपरूपांचे उपयोग खालीलप्रमाणे:

हिऱ्याचे उपयोग:

  1. काच कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणांत हिरे वापरतात.
  2. अलंकार तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग होतो.
  3. डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये हिऱ्याचा वापर करतात.
  4. हिऱ्याच्या भुकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी करतात.
  5. हिऱ्याचा उपयोग अवकाशात व कृत्रिम उपग्रहांमध्ये प्रारणापासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी करतात.

ग्रॅफाइटचे उपयोग:

  1. ग्रॅफाइटचा उपयोग वंगण तयार करण्यासाठी करतात.
  2. कार्बन इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी ग्रॅफाइटचा वापर करतात.
  3. ग्रॅफाइटचा वापर लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये केला जातो.
  4. रंग, पॉलिश यांच्यातही ग्रॅफाइटचा वापर करतात.
  5. खूप प्रकाश देणाऱ्या आर्क लॅम्पमध्ये ग्रॅफाइट वापरतात.

फुलरिनचे उपयोग:

  1. फुलरिनचा उपयोग विसंवाहक म्हणून करतात.
  2. जलशुद्धीकरणात फुलरिनचा उत्प्रेरक म्हणून वापर करतात.
  3. एका ठरावीक तापमानाला फुलरिन अतिवाहकता हा गुणधर्म दाखवतो.

कोळशाचे उपयोग:

  1. कारखान्यात व घरामध्ये कोळसा इंधन म्हणून वापरतात.
  2. कोक, कोल गॅस व कोल टार मिळवण्यासाठी कोळशाचा वापर करतात.
  3. विद्युत निर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा वापरतात.
  4. जलशुद्धीकरण तसेच सेंद्रिय पदार्थांच्या शुद्धीकरणासाठी चारकोल वापरतात.

कोकचे उपयोग:

  1. घरगुती इंधन म्हणून वापरतात.
  2. क्षपणकारक म्हणून कोकचा उपयोग करतात.
  3. वॉटर गॅस (CO + H2) व प्रोड्युसर गॅस (CO + H2 + CO2 + N2) ह्या वायुरुप इंधनाच्या निर्मितीत कोकचा उपयोग करतात.
shaalaa.com
अपरूपता व कार्बनची अपरूपे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 13: कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य - स्वाध्याय [पृष्ठ १४९]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 13 कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य
स्वाध्याय | Q 5. ई. | पृष्ठ १४९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×