हिंदी

सूचनेनुसार कृती करा: तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

1. चौकटी पूर्ण करा:   (2)

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ______
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - ______

तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.

तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.

तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश; डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.

2. आकृतिबंध पूर्ण करा:    (2)

3. खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा:   (2)

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास

4. काव्यसौंदर्यः   (2)

'आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.'

या ओळींतील विचारसौदर्य स्पष्ट करा.

आकलन

उत्तर

1. चौकटी पूर्ण करा:   (2)

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - मळवाट
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - खाचखळगे

2. 

3. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अवघड आणि कठीण परिस्थितींवर मात करून विजय मिळवला आणि एक नवीन इतिहास निर्माण केला. समाजातील अन्याय आणि भेदभावाविरुद्ध त्यांनी लढा दिला आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणला. त्यांच्या कृतींमुळे नवीन समाजिक क्रांतीची निर्मिती झाली.

4. कवी ज. वि. पवार यांनी महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव म्हणून ही कविता लिहिली आहे. या कवितेतून रूढ धार्मिक आणि सामाजिक बंधनांना झुगारून, नव्या समाजाचा पाया रचणाऱ्या कर्तृत्ववान नेत्याला आदरपूर्वक अभिवादन केले आहे.
चवदार तळ्याच्या घटनेला पन्नास वर्षे झाली असली तरी आजची तरुण पिढी डॉ. आंबेडकरांसारख्या खंबीर नेतृत्वाची वाट पाहत आहे. त्यांनी पुन्हा यावे आणि संघर्ष पुन्हा जोमाने सुरू व्हावा अशी तीव्र इच्छा या पिढीच्या मनात आहे. ही पिढी मानवतेच्या या लढ्यासाठी सज्ज आहे, पण त्यांना आंबेडकरांसारख्या नेतृत्वाची गरज आहे. चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी उफाळलेली जनतेची चळवळ आता शमली आहे, परंतु लढ्यासाठी तयार होऊन आपल्या नेत्याची प्रतीक्षा करत आहे. या कवितेतून डॉ. आंबेडकरांसारख्या महामानवाच्या पुनरागमनाची आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा संघर्ष उभा करण्याची आस व्यक्त होते.

shaalaa.com
तू झालास मूक समाजाचा नायक
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्न

आकृती पूर्ण करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ______ 


आकृती पूर्ण करा.


चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा.


‘तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून (तू झालास मूक समाजाचा नायक) जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.


अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

तू झालास मूक समाजाचा नायक

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. आकृत्या पूर्ण करा. (२)

  1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ___________
  2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करणारे - ___________

2. सत्य विधान ओळखा. (२)

  1. बाबासाहेब निघाले तेव्हा सूर्यफुलांनी त्यांचे स्वागत केले.
  2. बाबासाहेब बोलक्या जिवांचे नायक झाले.
  3. चवदार तळ्यावर बाबासाहेबांनी गुलामांच्या पायात बेड्या चढवल्या.
  4. विषम परिस्थितीवर स्वार होत बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला.

तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.

तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.

तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश; डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.

3. ओळींचा सरळ अर्थ लिहा. (२)

'तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत' या ओळींचा सरळ अर्थ लिहा.

4. विचार साैंदर्य लिहा. (२)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

तू झालास मूक समाजाचा नायक

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

'तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.'


पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.

तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.

तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश; डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.

1. असत्य विधान ओळखा. (२)

  1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांना महाकाव्याइतके महत्त्व प्राप्त झाले.
  2. पन्नास वर्षांनंतरही सूर्यफुले काळोखाच्या प्रदेशाचा ध्यास घेत उभी आहेत.
  3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाकडे पाहून साध्या काठ्यांच्याही संगिनी झाल्या.
  4. चवदार तळ्याच्या सत्याग्रहात जनमानस पेटून उठले होते.

2. खालील आकृती पूर्ण करा. (२)


पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

तू झालास मूक समाजाचा नायक

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
  3. दोन शब्दांचे अर्थ (२)
    अ) डचमळणे -
    ब) रणशिंग -

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायेत,
बिगूल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×