हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

सूत्री पेशीविभाजनाच्या चार अवस्था लिहा आणि कोणत्याही दोन अवस्थांचे स्पष्टीकरण करा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सूत्री पेशीविभाजनाच्या चार अवस्था लिहा आणि कोणत्याही दोन अवस्थांचे स्पष्टीकरण करा.

स्पष्ट कीजिए

उत्तर

कायपेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. सूत्री विभाजन मुख्य दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते. ते दोन टप्पे म्हणजे प्रकलविभाजन /केंद्रकाचे विभाजन (Karyokinesis) आणि परीकलविभाजन/जीवद्रव्याचे विभाजन(Cytokinesis). प्रकलविभाजन चार पायऱ्यांमध्ये पूर्ण होते.

अ. पूर्वावस्था (Prophase): प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलत: अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन (Folding/Condensation) होते. त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित (Sister chromatids) दृश्य व्हायला सुरुवात होते. तारा केंद्र (centriole) द्विगुणित होते व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्राकावरण (nuclear membrane) आणि केंद्रिका (nucleolus) नाहीसे व्हायला सुरुवात होते.

ब. मध्यावस्था (Metaphase): मध्यावस्थेमध्ये केंद्राकावरण पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्याअर्धगुणसूत्र जोडीसहित (Sister chromatids) स्पष्टपणे दिसतात. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला (मध्य प्रतलाला) समांतर अवस्थेत संरचित (Arrange) होतात. दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू (Centromere) यादरम्यान विशिष्ट अशा लवचीक प्रथिनांचे धागे (Spindle fibres/तुर्कतंतू) तयार होतात.

क. पश्चावस्था (Anaphase): पश्‍चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रबिंदूंचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्यगुणसूत्रे (Daughter chromosomes) म्हणतात. यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे दोन-दोन संच पेशीच्या दोन टोकांना पोहोचवले जातात.

ड. अंत्यावस्था (Telophase): अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात (Unfolding/ Decondensation). त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचांभोवती केंद्रकावरण तयार होते. अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये दोन जन्यकेंद्रके (Daughter nuclei) तयार होतात. जन्यकेंद्रकांमध्ये केंद्रिकासुद्‌धा दिसू लागतात. तुर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×