Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
(मॉरिशस : सागरदर्यातले साखरबेट) या पाठातील तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका गोष्टीचे वर्णन करा.
उत्तर
भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमधून भारतीय वंशाचे काही लोक कुलीघाटला उतरले आणि पुन्हा मायदेशी परतले नाहीत. ते तेथेच स्थायिक झाले. परंतु ते भारतीय संस्कृती विसरले नाहीत. भारतीय लोकांनी हजारो मैल दूर स्थलांतर करूनही आपल्या ओठांतली भाषा सोडली नाही. याची निशाणी म्हणून भारतातील केळी त्यांनी नेली आणि आपल्या घरापुढे ती केळी रुजवली. जर्द॑ हिरव्या पानांनी नटलेली व सुशोभित, रसरशीत पिकलेली केळी हे त्यांचे वैभव ठरले. ही सुंदर केळी मॉरिशसमधल्या प्रत्येक भारतीय घराला त्याचे भारतीयत्व देते आहे. ही गोष्ट मला सर्वांत जास्त आवडली.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या घटना कालानुक्रमाने लावा.
- मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाले.
- पहिला भारतीय मॉरिशसमध्ये पोहचला.
- मॉरिशसला डच पोहोचले.
- ब्रिटिशांनी फ्रेंचांकडून मॉरिशस बेट जिंकले.
आकृतिबंध पूर्ण करा.
आकृतिबंध पूर्ण करा.
भारतीय वंशाच्या लोकांचे मॉरिशसमधील प्रमाण -
घराला भारतीयत्व देणारी गोष्ट -
मॉरिशसची राजधानी -
मॉरिशसमध्ये असलेले छोटे बेट -
मॉरिशसच्या घरांचा आकार -
खालील शब्दांचे लिंग ओळखा व तक्ता पूर्ण करा.
अ. क्र. | शब्द | लिंग |
(१) | साखरबेट | |
(२) | होडी | |
(३) | घुमट | |
(४) | पृथ्वी |
स्वमत.
मॉरिशसला बहुरंगी निसर्गसौंदर्य लाभले आहे, याविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.