Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
ब्रझील वनस्पती
संक्षेप में उत्तर
उत्तर
- एखाद्या देशांमधील नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण त्या देशातील पर्जन्यमान, हवामान, भूमी आणि भूरचना या घटकांवर अवलंबून असते.
- ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार व भूरचनेमुळे तेथील पर्जन्यात फरक पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात बहुतांशी भागात वर्षभर पाऊस पडतो. जसजसे विषुववृत्तापासून दूर जावे तसतसे वर्षादिनांक कालावधी आणि पर्जन्यमान कमी होत जाते व परिणामी, वनस्पतींचा जीवनकाळही कमी होत जातो.
- ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत. यामध्ये सदाहरित, निमसदाहरित, शुष्क इत्यादी वनस्पतींचा समावेश होतो. येथे पाऊ ब्रसील, रबर, महोगनी, रोझवूड इत्यादी वृक्ष व आमर (ऑर्किड) वनस्पतींच्या अनेक प्रजाती आढळतात.
- ब्राझीलमध्ये विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर पडणाऱ्या पावसामुळे सदाहरित वने आढळतात. या सदाहरित वर्षावनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होत असल्याने कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणूनच, या वर्षावनांना 'जगाची फुप्फुसे' असे संबोधले जाते.
- ब्राझीलमध्ये ज्या प्रदेशात पाऊस ठरावीक काळात पडतो, त्याठिकाणी वृक्षांची घनता कमी होत जाते. अशा प्रदेशांत वनांच्या ऐवजी विविध प्रकारचे गवत, खुरटी झुडपे, काटेरी वनस्पती इत्यादी आढळतात.
shaalaa.com
ब्राझील- वनस्पती
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वेगळा घटक ओळखा.
ब्राझीलमधील वनप्रकार -
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलचा उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे.
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे.
ब्रझीलमधील सदाहरित वर्षावनांना ______ असे संबोधतात.
फरक स्पष्ट करा.
भारत वनस्पती व ब्रझील वनस्पती
ब्राझीलमधील वर्षावनांना काय संबोधले जाते?
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुप्फुसे असे संबोधतात.