Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
डॉ. होमी भाभा
उत्तर
पद्मभूषण डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी भारतातील अणुशास्त्राचा पाया घातला, म्हणून त्यांच्या नावाने 'बार्क' (भाभा अणुसंशोधन केंद्र) या अणुसंशोधन केंद्राचे नामकरण करण्यात आले आहे. डॉ. अनिल काकोडकर यांनी “मोठे होत असलेल्या मुलांनो...” या पाठात 'बार्क' मधील आपले अनुभव मांडले आहेत.
डॉ. भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी झाला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले. अणुशक्तीचा वापर करून वीज निर्मिती करता येईल आणि ती ऊर्जा शांततामय कार्यासाठी वापरता येईल, यामुळे देशात औद्योगिक क्रांती होऊन मानवाचे कल्याण साधता येईल, असे त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना पटवून दिले. त्यांच्या सहकार्याने अणुसंशोधन केंद्राची स्थापना झाली.
“त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रचंड स्फूर्तिदायक होते,” असे त्यांना प्रत्यक्ष पाहिलेल्या लेखकाने सांगितले आहे. डॉ. भाभा यांनी “सरकारच्या खर्चाचा विचार न करता संशोधन करा आणि स्वतःला सक्षम बनवा” असा मौल्यवान सल्ला लेखकाला दिला होता. २४ जानेवारी १९६६ रोजी विमान अपघातात त्यांच्या निधनाने देशाला मोठा धक्का बसला.
संबंधित प्रश्न
टिपा लिहा.
बार्क
'स्काय इस द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.
मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?
‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.
‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिमाणकारक असते,' हे विधान ‘मोठे होत असलेल्या मुलांनो...’ या पाठाधारे स्पष्ट करा.
डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे करा.
लेखकाचा बार्कमधील अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
डॉक्टर होमी भाभा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
वैज्ञानिक व विद्यार्थी यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
- टीप लिहा: व्युत्पत्ती कोशाचे कार्य.
- 'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.
- 'थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॉक्टस!' या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.
'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.