हिंदी

टिपा लिहा. जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिपा लिहा.

जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक

टिप्पणी लिखिए

उत्तर

'वीरांगना' या पाठात महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावुक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा धाडसी, प्रेरक व थक्क करणारा जीवनप्रवास मांडला आहे.
         कर्नल संतोष महाडिक यांनी देशासाठी केलेल्या बलिदानानंतर त्यांची पत्नी स्वाती खचून गेल्या नाहीत. समाजाने देऊ केलेले सुखासीन जीवन नाकारत आपल्या पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा साहसी निर्णय त्यांनी घेतला. भारतीय सैन्यदलात रुजू होता यावे, यासाठी त्यांनी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली. पहिल्याच प्रयत्नात 'स्टेट सिलेक्शन बोर्डाची' परीक्षा उत्तीर्ण करून शारीरिक व वैद्यकीय चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्या. 'ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी' चेन्नई या लष्करी प्रशिक्षण संस्थेतून आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या तरुण वर्गासोबत अत्यंत उत्साहाने अकरा महिन्यांचे खूप खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. ९ सप्टेंबर २०१७ रोजी त्या लेफ्टनंट पदावर रुजू झाल्या. सातवीतील कार्तिकी व दुसरीतील स्वराज अशी दोन गुणी मुले पदरात असतानाही आपल्या मेहनतीच्या व जिद्दीच्या बळावर सैन्यातील दोन अभिमानास्पद स्टार त्यांनी प्राप्त केले.
         लष्करी जीवन हासुद्धा जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे, ही त्यांची विचारसरणी आहे. आपण करत असलेल्या कोणत्याही कामाबद्दल अधिक जाणून घेऊन अधिक शिकणे व त्यासाठी कठोर परिश्रम घेणे हे त्यांचे गुणवैशिष्ट्य होय. पती निधनाचे अमर्याद दु:ख बाजूला ठेवत पतीचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणाऱ्या व भारतातील इतरही अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा देणाऱ्या स्वाती महाडिक यांची जिद्द त्यांच्या एकूणच जीवनप्रवासात दिसून येते.

shaalaa.com
वीरांगना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 15.2: वीरांगना - कृती क्रमांक २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
अध्याय 15.2 वीरांगना
कृती क्रमांक २ | Q 3. 1. (आ)

संबंधित प्रश्न

खालील आकृती पूर्ण करा.


‘कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.


टिपा लिहा.

देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक


टिपा लिहा.

जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक


‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.


‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.


पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.


‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.


‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.


'पती निधनानांतर आपण सैन्यात भरती व्हायचं', स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.


टिपा लिहा.

देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक


'प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश', पाठाच्या आधारे स्पष्ट करा.


मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.


टिपा लिहा.

मुले भरकटण्याची कारणे


टिपा लिहा.

रेखाजींच्या कार्याचा परिणाम


भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×