Advertisements
Advertisements
प्रश्न
'पती निधनानांतर आपण सैन्यात भरती व्हायचं', स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर
'वीरांगना' या पाठात महाराष्ट्रातील कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावनिक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा धाडसी, प्रेरणादायी आणि थक्क करणारा जीवनप्रवास उलगडला आहे. दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करणाऱ्या आपल्या पती कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम 'भारतीय सैन्यदल आणि त्याची वर्दी' असल्याचे स्वाती यांना चांगलेच माहीत होते. पतीच्या अकाली निधनानंतर त्यांनी आपल्या अमर्याद दु:खाला बाजूला ठेवून पतीचे भारतमातेची सेवा करण्याचे व्रत स्वतः स्वीकारले. देशसेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अपार मेहनतीने लेफ्टनंटपद प्राप्त केले. दु:खाचा डोंगर कोसळूनही त्यांनी अचल वृत्तीने तत्त्वनिष्ठा जपली आणि पतीप्रमाणे देशसेवेच्या मार्गावर पाऊल ठेवले. स्वाती महाडिक यांचा हा निर्धार समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कृतीतून वैयक्तिक दु:खापेक्षाही देशप्रेम किती मोठे आहे, याचा संदेश त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर, पुरुषप्रधान संस्कृतीत अनेक महिलांना सैन्यदलात सामील होण्यासाठी प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे.
संबंधित प्रश्न
खालील आकृती पूर्ण करा.
‘कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
टिपा लिहा.
देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.
पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.
खालील आकृती पूर्ण करा.
टिपा लिहा.
देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
टिपा लिहा.
जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक
'मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा', या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
'भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत', हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.