Advertisements
Advertisements
प्रश्न
'भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत', हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर
'वीरांगना' या प्रस्तुत पाठात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलातील सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या स्तुत्य सामाजिक कार्याचा थोडक्यात परिचय दिला आहे.
पालकांसोबत होणारे वाद, मुंबईचे किंवा बॉलिवूडचे आकर्षण, शहरातील पत्ता माहीत नसणाऱ्या नातेवाईकांचा ठावठिकाणा शोधताना झालेली दिशाभूल, गरिबी, फेसबुकवरील मैत्रीचा शोध, बेकायदेशीर कामांकरता केले जाणारे अपहरण अशा विविध कारणांसाठी आईवडिलांपासून, घरापासून दुरावलेल्या मुलांना अनोळखी ठिकाणी मायेचा आधार देणे अत्यंत आवश्यक असते. ही मुले-मुली कोणत्याही वाईट प्रवृत्तींना बळी पडू शकतात. त्यांचा चुकीच्या, वाईट कामांकरता वापर करून घेतला जाऊ शकतो. त्यांचे बालवय कुस्करले जाते. त्यांचे भविष्य असुरक्षित होते, धोक्यात येते. अशा मुलांना सन्मार्ग दाखवण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी केले. त्यामुळे, या मुलांना स्वत:चा विकास घडवण्याची संधी उपलब्ध झाली. कुटुंबापासून दुरावल्या गेलेल्या या मुलांना जीवनानंद मिळाला. यामुळेच, या मुलांच्या आयुष्याला योग्य वळण देण्याचे व राष्ट्रघडणीत मोलाचे ठरणारे रेखाजींचे कार्य नक्कीच प्रशंसनीय आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील आकृती पूर्ण करा.
‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
हा पाठ (वीरांगना) वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा.
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.
पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.
‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
टिपा लिहा.
देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
टिपा लिहा.
जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.
टिपा लिहा.
मुले भरकटण्याची कारणे
टिपा लिहा.
रेखाजींच्या कार्याचा परिणाम
‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे ‘वीरांगना’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.