Advertisements
Advertisements
प्रश्न
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
उत्तर
'वीरांगना' या पाठात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलातील इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या स्तुत्य सामाजिक कार्याचा आढावा घेतला आहे.
पालकांशी भांडल्यामुळे, गरिबीमुळे, बॉलिवुडच्या आकर्षणामुळे, अपहरण झाल्यामुळे किंवा अशा इतर अनेक कारणांमुळे मुले मुंबई शहरात येऊन भरकटतात. त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवणे, त्यांचा वाईट प्रवृत्तींपासून बचाव करणे, त्यांच्या आयुष्याला योग्य मार्गावर आणून त्यांचे भविष्य घडवणे असे अत्यंत महान व अनोखे कार्य सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा करत आहेत. त्यांच्या या कार्याची माहिती वाचताना त्यांच्याविषयी प्रचंड आदर वाटतो. त्यांच्या कामामुळे अनेक मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचत आहे, ही भावना दिलासा देणारी आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांच्याबद्दल अभिमानही वाटतो व अशा प्रकारचे कार्य करण्याची प्रेरणाही मिळते. त्याचबरोबर नकळत्या वयात चुकीच्या मार्गावर जाण्यामुळे किती घातक परिणाम होऊ शकतात याचीही जाणीव ही माहिती वाचताना होते. एक किशोरवयीन म्हणून आपणही अधिक सावधानतेने, काळजीपूर्वक समाजात वावरले पाहिजे, सखोल विचार केला पाहिजे याची तीव्रतेने जाणीव होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
‘कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
टिपा लिहा.
देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
टिपा लिहा.
जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक
हा पाठ (वीरांगना) वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा.
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.
‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
खालील आकृती पूर्ण करा.
'कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला', या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
टिपा लिहा.
देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
टिपा लिहा.
जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक
'मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा', या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.
टिपा लिहा.
रेखाजींच्या कार्याचा परिणाम
'भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत', हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.