हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

टीपा लिहा. राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीपा लिहा.

राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री

टिप्पणी लिखिए

उत्तर

१९०५ च्या राष्ट्रीयसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले होते. त्यांनी वंगभंग आंदोलनास पाठिंबा दिला. १९०६च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी 'स्वराज्य' या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. अध्यक्षीय भाषणात त्यांनी एकजूट करा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा म्हणजे आज जे लक्षावधी बांधव दारिद्र्य, उपासमार व रोगराई यांना बळी पडत आहेत त्यांना वाचवता येईल व सुधारलेल्या राष्ट्रांत भारताला जे मानाचे स्थान होते, ते पुन्हा प्राप्त होईल असा संदेश दिला. याच अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुःसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ. स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधनसामग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील आणि यातूनच आपल्या देशाचे हित साधता येईल. परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही पहिली पायरी तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पायरी असे ठरले. बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घालता येईल असे नेत्यांचे मत होते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5.3: स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ - स्वाध्याय [पृष्ठ १३८]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 5.3 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ
स्वाध्याय | Q ३. (३) | पृष्ठ १३८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×