Advertisements
Advertisements
Question
टीपा लिहा.
राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री
Solution
१९०५ च्या राष्ट्रीयसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले होते. त्यांनी वंगभंग आंदोलनास पाठिंबा दिला. १९०६च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी 'स्वराज्य' या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. अध्यक्षीय भाषणात त्यांनी एकजूट करा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा म्हणजे आज जे लक्षावधी बांधव दारिद्र्य, उपासमार व रोगराई यांना बळी पडत आहेत त्यांना वाचवता येईल व सुधारलेल्या राष्ट्रांत भारताला जे मानाचे स्थान होते, ते पुन्हा प्राप्त होईल असा संदेश दिला. याच अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुःसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ. स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधनसामग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील आणि यातूनच आपल्या देशाचे हित साधता येईल. परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही पहिली पायरी तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पायरी असे ठरले. बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घालता येईल असे नेत्यांचे मत होते.