Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत लिहा.
पर्यटन स्थळांची काळजी सर्वांनी घ्यावी.
संक्षेप में उत्तर
उत्तर
देशाच्या विकासात पर्यटन स्थळांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. हे महत्त्व प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे.
(१) पर्यटन स्थळे हा आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा ठेवा आहे.
(२) आपले किल्ले, वास्तू, लेणी, येथील निसर्ग या गोष्टी आपल्या इतिहासाची साक्ष देतात. हे वैभव पाहण्यासाठी देशाविदेशातील हजारो पर्यटक येतात.
(३) पर्यटकांच्या पर्यटनातून आपल्याला फार मोठे परकीय चलन मिळते.
(४) पर्यटनामुळे हजारो व्यवसाय निर्माण होतात व त्यातून रोजगार निर्माण होतात.
(५) स्थानिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित होतात. कला उदयोगांना चालना मिळते.
(६) पर्यटन स्थळांची काळजी केवळ सरकारने घेऊन चालणार नाही. ती प्रत्येकानेच घेतली पाहिजे. अन्यथा वरील सर्व पर्यटनाचे फायदे आपल्याला व देशाला होणार नाहीत.
shaalaa.com
सामाजिक क्षेत्र - पर्यावरण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?