Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत लिहा.
संरक्षणविषयक सराव दोन राष्ट्रांनी एकत्र करणे आवश्यक असते.
संक्षेप में उत्तर
उत्तर
संरक्षणविषयक सराव दोन राष्ट्रांनी एकत्र करणे आवश्यक असते; कारण -
(१) अशा लष्करी सरावांमुळे एकमेकांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण होते.
(२) दहशतवादयांशी कसा मुकाबला करायचा याची माहिती होते.
(३) दहशतवादाशी मुकाबला करताना कोणते मार्ग हाताळायचे असतात यांची माहिती होते.
(४) शहरी भागात, दुर्गम प्रदेशांत लष्करी समस्यांना कसे तोंड दयायचे याचे प्रशिक्षण सैन्याला मिळते.
(५) आपल्या राष्ट्राच्या क्षमता आणि मर्यादा माहीत होतात.
(६) त्यातूनच लष्कर व शस्त्रास्त्रे यांच्या आधुनिकीकरणाची गरज, सैन्याचे प्रशिक्षण व क्षमता वाढवणे इत्यादींबाबत उपाययोजना करण्याची संधी मिळते.
shaalaa.com
सामाजिक क्षेत्र - पर्यावरण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?