Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत नोंदवा.
औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला.
उत्तर
(१) आपल्या राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देतानाच आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्रांची आर्थिक कोंडी करणे, यालाच 'आर्थिक राष्ट्रवाद' असे म्हणतात.
(२) औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंड, फ्रान्स अशा पुढारलेल्या आणि साम्राज्यवादी राष्ट्रांचे औद्योगिक उत्पादन वाढले.
(३) अतिरिक्त उत्पादनाने या राष्ट्रांना नव्या बाजारपेठा मिळवणे, कच्च्या मालाची पुरवठा केंद्रे शोधणे व त्याचा सतत पुरवठा चालू ठेवणे भाग पडले.
(४) कच्चा माल मिळवणे व हक्काच्या बाजारपेठा मिळवणे यांसाठी ही राष्ट्रे साम्राज्यविस्ताराकडे वळली.
(५) जिंकलेल्या प्रदेशांतील लोकांचे शोषण करणे, त्यांच्या व्यापारावर निबंध घालून आपल्या राष्ट्राची भरभराट करणे या प्रकारचा आर्थिक राष्ट्रवाद उदयास आला.
अशा रितीने औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला.