Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा.
संत ज्ञानेश्वर
विस्तार में उत्तर
उत्तर
- ते संप्रदायातील एक विख्यात संत होते. त्यांनी वारकरी चळवळीला धर्माची प्रतिष्ठा दिली.
- त्यांनी सामान्यांना आचरता येईल, असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्मांची प्रतिष्ठा मिळवून दिली.
- त्यांचे जीवन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले परंतु त्यांनी कधीही मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही.
- त्यांनी 'भगवद्गीता' या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा 'भावार्थदीपिका' अर्थात 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ रचला.
- ज्ञानेश्वरीतील 'पसायदान' उदात्त संस्कार करणारे आहे. त्यांनी 'अमृतानुभव' या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथांतून व अभंगांतून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले.
- त्यांचे भाऊ संत निवृत्तिनाथ आणि संत सोपानदेव आणि त्यांची बहीण मुक्ताबाई यांच्या काव्यरचना देखील प्रसिद्ध आहेत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?