Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा.
संत तुकाराम
विस्तार में उत्तर
उत्तर
- ते पुण्याजवळील देहू येथील एक महान संत होते. भक्तीमध्ये नैतिकता असायला हवी यावर त्यांचा भर होता.
- त्यांचे अभंग अतिशय प्रसन्न, प्रासादिक व स्पष्ट आणि काव्यात्मकदृष्ट्या समृद्ध आहेत. संत तुकारामांची 'गाथा' ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे.
- त्यांनी भक्ती आणि नीतीला महत्त्व दिले. दीनदुबळ्यांमध्ये देवत्व शोधण्यास सांगितले.
- त्यांच्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जांची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले.
- त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही, असा दावा करून त्यांनी त्यांच्या वह्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या.
- त्यांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती-जमातींचे होते. गंगारामपंत मावळ आणि संताजी जगनाडे यांनी त्यांचे अभंग लिहिले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?