Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
उत्तर
प्रभात या कवितेत कवी किशोर बळी यांनी नव्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात आपण सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या ज्ञानाचा सदुपयोग करून आपल्यातील कलागुणांचा विकास घडवावा व भेदाभेद मिटवून देशाला प्रगतिप्रथावर न्यावे असा संदेश दिला आहे. माहितीचा, ज्ञानाचा वाहता झरा या नव्या विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला लाभला आहे. यामुळे, आपल्या कलागुणांचा विकास घडवण्याची संधी प्रत्येकाला प्राप्त होत आहे. विश्वाच्या पसाऱ्यातील प्रत्येक व्यक्ती नवी स्वप्ने पाहत आहे. ती स्वप्ने पूर्ण करण्याची, सत्यात उतरवण्याची, साकार करण्याची इच्छा, आशा मनात बाळगत आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची झालेली प्रगती व सर्वसामान्यांचे बदललेले जीवन पाहता नक्कीच झपाट्याने परिवर्तन घडत आहे, असे वाटते. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे या नव्या युगात सर्वच क्षेत्रात झालेला लक्षणीय विकास जणू प्रगतीची नवीन परिभाषा साकार करत आहे, असा अर्थ कवी व्यक्त करतो.
संबंधित प्रश्न
योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) नव्या युगाच्या नभात | (अ) व्यक्तित्वाची जडणघडण |
(२) प्रतिभेची प्रभात | (आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे. |
(३) पायाभरणी अस्तित्वाची | (इ) नवनिर्मितीची पहाट |
(४) व्यक्तित्वाची प्रयोगशाळा | (ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात |
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
युगात -
खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.
(अ) आकाश-
(आ) सुगंध-
(इ) सुंदर-
(ई) शरीर-
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
किनारा -
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।
आकृती पूर्ण करा.
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.
आकृती पूर्ण करा.
निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टींपासून तुम्हांला काय काय शिकता येईल, याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा.