Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
'गीर्यारोहणाचा अनुभव' हा पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हांला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा.
उत्तर
ईशानला गिर्यारोहणाचा छंद होता. हा छंद त्याने जाणीवपूर्वक जपला होता. त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी विशेष प्रशिक्षणही घेतले होते. त्यावरून त्याची जिज्ञासूवृत्ती, निसर्गाची आवड आणि धाडसीपणा हे गुण दिसून येतात. गंगोत्रीला गिर्यारोहणासाठी जाताना तो आपल्या मित्रांनाही घेऊन जातो यावरून त्याचे संघटन कौशल्य दिसून येते.
तीर्थयात्रेच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत यात्रेकरूंना लुटणाऱ्या दुकानदाराला तो विरोध दर्शवतो, या प्रसंगातून त्याचा स्पष्टवक्तेपणा दिसून येतो. स्वत: कठीण परिस्थितीत अडकलेले असतानाही तेथून पळ न काढता अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना ईशान आणि त्याच्या साथीदारांनी सर्वप्रकारे मदत केली. त्याची परोपकारी वृत्ती आणि सहकार्याची भावना यातून दिसून येते.
हवाईदलाच्या हेलिकॉप्टरचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी ईशान व त्याचे मित्र लाकडे जाळून धूर तयार करतात, यावरून त्यांच्यामधील हुशारी आणि समयसूचकता हे गुण दिसून येतात.
संबंधित प्रश्न
काय ते सांगा.
मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय.
एका शब्दांत उत्तर लिहा.
ओलं असताना जसं असतं तसंच वाळल्यावरही राहतं -
एका शब्दात उत्तरे लिहा.
माणसाच्या जीवनव्यवहारात मदत करणारी -
आकृती पूर्ण करा.
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
नाक-
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
जीभ-
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णयक्षमता वाढवतो, तुमच्या शब्दांत लिहा.
आकृती पूर्ण करा.
आकृत्या पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.