Advertisements
Advertisements
Question
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
'गीर्यारोहणाचा अनुभव' हा पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हांला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा.
Solution
ईशानला गिर्यारोहणाचा छंद होता. हा छंद त्याने जाणीवपूर्वक जपला होता. त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी विशेष प्रशिक्षणही घेतले होते. त्यावरून त्याची जिज्ञासूवृत्ती, निसर्गाची आवड आणि धाडसीपणा हे गुण दिसून येतात. गंगोत्रीला गिर्यारोहणासाठी जाताना तो आपल्या मित्रांनाही घेऊन जातो यावरून त्याचे संघटन कौशल्य दिसून येते.
तीर्थयात्रेच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत यात्रेकरूंना लुटणाऱ्या दुकानदाराला तो विरोध दर्शवतो, या प्रसंगातून त्याचा स्पष्टवक्तेपणा दिसून येतो. स्वत: कठीण परिस्थितीत अडकलेले असतानाही तेथून पळ न काढता अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना ईशान आणि त्याच्या साथीदारांनी सर्वप्रकारे मदत केली. त्याची परोपकारी वृत्ती आणि सहकार्याची भावना यातून दिसून येते.
हवाईदलाच्या हेलिकॉप्टरचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी ईशान व त्याचे मित्र लाकडे जाळून धूर तयार करतात, यावरून त्यांच्यामधील हुशारी आणि समयसूचकता हे गुण दिसून येतात.
RELATED QUESTIONS
एका शब्दात उत्तरे लिहा.
सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते -
आकृती पूर्ण करा.
कारणे शोधा व लिहा.
पोटोबा अधूनमधून गुरगुरतो, कारण.......
आकृती पूर्ण करा.
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.
आकृती पूर्ण करा.
गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
आकृती पूर्ण करा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल आला ते ठिकाण-
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दांत लिहा.