Advertisements
Advertisements
Question
गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
Solution
माझ्या आठवणीतला सुंदर निसर्गानुभव म्हणजे भोपरच्या जंगलात पक्षी निरीक्षणातून मिळालेला अनुभव . मी आणि माझे मित्र आमच्या पक्षीनिरीक्षक दादासोबत पक्षीनिरीक्षण करण्याकरता गेलो होतो. जंगलात दिसणारे विविध प्रकारचे, विविधरंगी, वेगवेगळे आवाज करणारे पक्षी म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच ठरली. त्यातच एका विशिष्ट ठिकाणी आम्ही पोहोचलो, तेव्हा एक पक्षी स्वत:च्या आवाजाने आमचे लक्ष विचलित करत होता. आम्हांला स्वत:कडे आकर्षित करून त्या ठिकाणाहून दूर नेत होता. आमच्या दादाला त्यामागची गंमत समजली होती. या पक्ष्याची अंडी त्याच प्रदेशात असणार व आम्ही त्या अंड्यांपर्यंत पोहोचू नये, म्हणून तो पक्षी आम्हांला दूर नेऊ पाहत होता हे दादाच्या लक्षात आले. त्याने ती अंडी शोधून काढली. मग दुरूनच आम्ही ती लालसर पांढरी अंडी पाहिली व तेथून तात्काळ दूर निघालो. आपल्यामुळे त्या अंड्यांना धोका पोहोचू नये हा यामागील हेतू होता. आपल्या पिलांसाठी स्वत:ला धोक्यात टाकणाऱ्या या आईची ममता पाहून वेगळेच सुख मिळाले.
RELATED QUESTIONS
योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) पिवळा | (अ) झाडांच्या पानापासून |
(२) जांभळा | (आ) दगडांपासून |
(३) भगवा | (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून |
(४) हिरवा | (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून |
एका शब्दांत उत्तर लिहा.
चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद -
एका शब्दांत उत्तर लिहा.
ओलं असताना जसं असतं तसंच वाळल्यावरही राहतं -
विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते -
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
रंगिली पायवाट -
आकृत्या पूर्ण करा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक-
आकृती पूर्ण करा.
‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’, हे विधान पाठाधारे पटवून द्या.