Advertisements
Advertisements
Question
‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’, हे विधान पाठाधारे पटवून द्या.
Solution
लेखिकेने जनावरांच्या इस्पितळातील भेट दिलेल्या मांजर व कुत्र्यांच्या विभागातील त्यांचे अनुभव प्रस्तुत पाठात दिलेले आहेत. लेखिकेने प्रवेश केल्या केल्या तेथील कार्यालयातील बोका टेबलावर येऊन बसतो व तेथील साहेबाकडून लाड करून घेतो. मांजरांच्या विभागात गेल्यावरही तेथील मांजरांच्या डोळ्यांत असलेली आतुरता लेखिकेला दिसते. या आतुरतेपोटी जाळीवर नाक घासून, नखांनी जाळ्या खरवडून, मियाँव मियाँव करून, एकच कलकलाट करून ती मांजरे लेखिकेचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा लेखिका त्यांचे लाड करते तेव्हा मांजरं खूश होऊन गुर्रगुर्र आवाज करून समाधान व्यक्त करतात. जेव्हा लेखिका मांजरांचा निरोप घेऊन बाहेर पडते, तेव्हा मांजरांच्या चेहऱ्यावर लेखिकेला खिन्नता दिसते. पुढे लेखिका जेव्हा कुत्र्यांच्या विभागात जाते, तेव्हादेखील काही कुत्रे त्यांच्या दिशेने झेपावतात. एक कुत्रा तर दोन पंजे जुळवून लेखिकेला नमस्कार करतो. या सर्व प्राण्यांनी लेखिकेला पाहून दिलेल्या प्रतिक्रियांमधून हे सर्वच प्राणी माणसांच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात याचा प्रत्यय येतो.
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
रंगिली पायवाट -
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दांत वर्णन करा.
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
कावळ्या किल्ला
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
एका शब्दात उत्तर लिहा.
लेखकाचा आवडता खेळ -
पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा.
सावरीच्या कापसाचे जणू मऊमऊ गोळेच!
पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा.
‘‘जन्मापासून आंधळी आहे ती!’’
आकृती पूर्ण करा.