Advertisements
Advertisements
प्रश्न
‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’, हे विधान पाठाधारे पटवून द्या.
उत्तर
लेखिकेने जनावरांच्या इस्पितळातील भेट दिलेल्या मांजर व कुत्र्यांच्या विभागातील त्यांचे अनुभव प्रस्तुत पाठात दिलेले आहेत. लेखिकेने प्रवेश केल्या केल्या तेथील कार्यालयातील बोका टेबलावर येऊन बसतो व तेथील साहेबाकडून लाड करून घेतो. मांजरांच्या विभागात गेल्यावरही तेथील मांजरांच्या डोळ्यांत असलेली आतुरता लेखिकेला दिसते. या आतुरतेपोटी जाळीवर नाक घासून, नखांनी जाळ्या खरवडून, मियाँव मियाँव करून, एकच कलकलाट करून ती मांजरे लेखिकेचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा लेखिका त्यांचे लाड करते तेव्हा मांजरं खूश होऊन गुर्रगुर्र आवाज करून समाधान व्यक्त करतात. जेव्हा लेखिका मांजरांचा निरोप घेऊन बाहेर पडते, तेव्हा मांजरांच्या चेहऱ्यावर लेखिकेला खिन्नता दिसते. पुढे लेखिका जेव्हा कुत्र्यांच्या विभागात जाते, तेव्हादेखील काही कुत्रे त्यांच्या दिशेने झेपावतात. एक कुत्रा तर दोन पंजे जुळवून लेखिकेला नमस्कार करतो. या सर्व प्राण्यांनी लेखिकेला पाहून दिलेल्या प्रतिक्रियांमधून हे सर्वच प्राणी माणसांच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात याचा प्रत्यय येतो.
संबंधित प्रश्न
एका शब्दांत उत्तर लिहा.
घोड्याच्या शेणाला म्हणतात -
स्वमत स्पष्ट करा.
‘आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत’ या विधानाबाबत तुमचे मत.
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
जिगरबाज भटके -
एका शब्दात उत्तर लिहा.
लेखकाला मिळालेला पुरस्कार-
आकृती पूर्ण करा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल आला ते ठिकाण-
एका शब्दात उत्तरे लिहा.
अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण-
आकृती पूर्ण करा.
‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?’ या वाक्यांतून तुम्हांला प्राण्यांबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
पाऊस कोसळत असताना एक छोटे कुत्र्याचे पिल्लू दाराशी येऊन बसले आहे, अशावेळी तुम्ही काय कराल ते लिहा.