Advertisements
Advertisements
प्रश्न
‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?’ या वाक्यांतून तुम्हांला प्राण्यांबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
उत्तर
प्रेम या भावनेची गरज फक्त माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही असते. विशेषत: पाळीव प्राण्यांना तर माणसाकडून प्रेम, कौतुक, आपुलकीची अपेक्षा असते. परळच्या जनावरांच्या इस्पितळात लेखिकेने वाचलेल्या 'आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?' या वाक्यातून प्राण्यांचे हे प्रेमासाठी आसुसलेले असणे व्यक्त होते. या वाक्यातून जणू काही हे प्राणी माणसाला आवाहन करत आहेत. 'आमच्यावर प्रेम करा, माया करा' अशी जणू विनंती करत आहेत असे वाटते. ही प्राण्यांमधली संवेदनशीलता, प्रेमाची ओढ हे वाक्य समर्पकपणे व्यक्त करते.
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
‘तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते’ या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
माणसाच्या जीवनव्यवहारात मदत करणारी -
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
स्वमत स्पष्ट करा.
‘आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत’ या विधानाबाबत तुमचे मत.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व स्पष्ट करा.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णयक्षमता वाढवतो, तुमच्या शब्दांत लिहा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक-
लेखिकेने अनुभवलेली इस्पितळातील प्राण्यांची दुनिया तुमच्या शब्दांत लिहा.