Advertisements
Advertisements
प्रश्न
लेखिकेने अनुभवलेली इस्पितळातील प्राण्यांची दुनिया तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर
लेखिका मुंबईच्या परळ भागातील जनावरांचे इस्पितळ पाहायला गेली. कार्यालयाच्या दाराशी असलेल्या तसबिरीखालचे 'आम्हांला तुमची गरज आहे, तुम्हांला आम्ही हवे आहोत का?' हे वाक्य मुक्या प्राण्यांनी जणू माणसाच्या दयाबुद्धी व करुणेला आवाहन करणारे आहे असे तिला वाटले.
लेखिकेने तेथे विविध विभागांना भेट दिली. मांजरांच्या विभागात सर्व पेशंटचे खाणेपिणे, औषध, राहणे यांची उत्तम सोय होती; पण सर्वच मांजरं जणू लेखिकेचे लक्ष वेधून घेऊ लागली. त्यांचा एकटेपणा, माणसांच्या प्रेमाची ओढ लेखिकेच्या मनाला भिडली. कुत्र्यांच्या विभागात फिरून लेखिकेने लठ्ठ-रोड, चिडक्या-शांत अशा विविध कुत्र्यांसोबत, गोजिरवाण्या पिलांसोबत वेळ घालवला. माणसांसारख्याच सोयी-सुविधा, औषधोपचार यांचा अनुभव घेणाऱ्या या प्राण्यांना माणसांच्या प्रेमाची, लाडाची, आपुलकीची असणारी अनिवार ओढ लेखिकेने अनुभवली. या अनोख्या जगातून बाहेर पडतानाही या प्राण्यांविषयीची करुणा व त्यांच्या संवेदनशीलपणाची जाणीव मनात ठेवून लेखिका निघाली.
संबंधित प्रश्न
योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) पिवळा | (अ) झाडांच्या पानापासून |
(२) जांभळा | (आ) दगडांपासून |
(३) भगवा | (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून |
(४) हिरवा | (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून |
एका शब्दांत उत्तर लिहा.
बांबूच्या कोवळ्या काडीपासून तयार व्हायचा -
विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी -
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
पाय-
पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.
पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात. |
↓ |
______ |
↓ |
पापण्यांमधून अलगदपणे वाहून जातात. |
↓ |
______ |
एका शब्दात उत्तर लिहा.
लेखकाला मिळालेला पुरस्कार-
एका शब्दात उत्तर लिहा.
खास व्यायामासाठीच असलेले ठिकाण -
गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
आकृती पूर्ण करा.