Advertisements
Advertisements
Question
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णयक्षमता वाढवतो, तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णयक्षमता वाढवतो. खेळामुळे खेळाडूच्या अंगी विविध गुणांची रुजवणूक होते. नेतृत्व गुण, स्वावलंबन, निर्णयक्षमता, जबाबदारपणा, कणखरता, हार स्वीकारण्याची वृत्ती, खिलाडू वृत्ती हे गुण खेळाडूच्या अंगी रुजतात. प्रत्येक खेळाडू हा खेळातील हार किंवा विजयास स्वत:च कारणीभूत असतो. यातून जबाबदारीची जाणीव त्याच्या अंगी बाणवली जाते. त्या बळावरच प्रत्येक खेळाडू स्वत: जबाबदारी घेऊन पूर्णपणे स्वत:च्या बळावर लढू लागतो. त्यामुळे, त्याच्या अंगी स्वावलंबनाची वृत्ती जोपासली जाते. खेळात झटपट निर्णय घ्यावे लागतात. ठरवलेल्या गोष्टींमध्ये परिस्थितीनुसार अचानकपणे बदल करावे लागतात. परिणामी, तात्काळ निर्णय घेऊन पुढचा डाव खेळावा लागतो. यामुळे, खेळाडूच्या अंगी उत्तम निर्णयक्षमता रुजते. अशाप्रकारे, खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णयक्षमता वाढवतो.
RELATED QUESTIONS
एका शब्दांत उत्तर लिहा.
घोड्याच्या शेणाला म्हणतात -
एका शब्दात उत्तरे लिहा.
माणसाच्या जीवनव्यवहारात मदत करणारी -
एका शब्दात उत्तरे लिहा.
जिव्हाताई ने ज्यांना संपात सामील करून घेतले ते -
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
हात-
पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.
पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात. |
↓ |
______ |
↓ |
पापण्यांमधून अलगदपणे वाहून जातात. |
↓ |
______ |
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
जिगरबाज भटके -
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व स्पष्ट करा.
‘वनडे’ क्रिकेटची मॅच बघत असताना प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांबाबत मित्रांशी चर्चा करून यादी तयार करा.
‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?’ या वाक्यांतून तुम्हांला प्राण्यांबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
लेखिकेने अनुभवलेली इस्पितळातील प्राण्यांची दुनिया तुमच्या शब्दांत लिहा.