हिंदी

उद्योजकाची कार्ये स्पष्ट करा. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उद्योजकाची कार्ये स्पष्ट करा.

स्पष्ट कीजिए

उत्तर

  1. उद्दिष्टांचे निर्धारण (Determination of Objectives): उद्योजकाला व्यवसायाची उद्दिष्टये निर्धारीत करणे आवश्यक असते. संघटनेच्या प्राथमिक आणि दुय्यम उद्दिष्टांमध्ये फरक असू शकतो. बाजारातील परिस्थितीनुसार उद्योजक ही उद्दिष्टये बदलू शकतो.
  2. नावीन्य (Innovation): उद्योजक मूलतः नावीन्यपूर्ण असतो. तो उत्पादनाची नवनवीन साधने शोधतो. त्यातून त्याने नवीन उत्पादने सादर करणे किंवा सद्य उत्पादनांमध्ये बदल करणे आवश्यक असते. ग्राहकांना नवीन उत्पादने किंवा सद्य उत्पादनातील नवीन वैशिष्ट्ये नेहमीच समाधान देतात. व्यवसायामध्ये उद्‌भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी नवनिर्मिती आवश्यक असते.
  3. बाजाराचा विकास (Development of Market): उद्योजकांना त्यांच्या उद्योगातील उत्पादने व सेवांचे विपणन करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात. ते ग्राहकांची मागणी समजून घेण्यासाठी सर्वेक्षण करू शकतात किंवा संशोधन करू शकतात. जेव्हा बाजारपेठ सतत विकसित केल्या जातात तेव्हा ग्राहकांच्या मागण्यादेखील वाढतात.
  4. नवीन तंत्रज्ञान (New Technology): जागतिक विश्वात दररोज नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागतो. नवीन तंत्रज्ञानाच्या परिचयाने व्यवसायाची वाढ होते. उदा. नवीन यंत्रणा, प्रगत तंत्रज्ञान, उत्पादनाची नवीन आणि वैज्ञानिक पद्धती.
  5. चांगले संबंध (Good Relations): संस्थेमध्ये कामकाजाचे वातावरण निरोगी राखणे आवश्यक आहे. चांगले संबंध हे कनिष्ठ आणि वरिष्ठांमधील कार्यक्षम संबंधावर अवलंबून असतात. कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.
  6. निधीची उपलब्धता (Organizing Funds): उद्योजकाला भिन्न आर्थिक संसाधने शोधण्याची आवश्यकता असते. कारण पुरेसे व सातत्यपूर्ण भांडवल व्यवसायासाठी आवश्यक असते. प्रत्येक व्यवसायासाठी गुंतवणूकदारांशी चांगले आणि प्रामाणिक संबंध आवश्यक असतात.
  7. निर्णय घेणे (Taking Decision): उद्योजकाला त्याच्या उद्योगासाठी योग्य निर्णय घ्यावे लागतात. वेळेत व योग्य निर्णय घेणेदेखील महत्त्वाचे आणि आवश्यक असते. कोणताही व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी त्याने नेहमी साधक बाधक गोष्टींचा विचार केला पाहिजे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×