Advertisements
Advertisements
प्रश्न
उत्तरे लिहा.
अभिषेकने केलेला निश्चय-
उत्तर
अभिषेकने केलेला निश्चय- कॉलेजला बसने ये-जा करण्याचा.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
कारणे लिहा.
पावडेकाकांचा चेहरा पडला, कारण ________.
कारणे लिहा.
रेखामावशीची पावलं अधिक सुंदर आहेत कारण ______.
कारणे लिहा.
अभिषेकचे बाबा म्हणतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, कारण ______
उत्तरे लिहा.
स्नेहलने केलेला निश्चय-
पाठातील पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये लिहून तक्ता पूर्ण करा.
व्यक्ती | अभिषेक | सुमित | स्नेहल | पावडेकाका | रेखामावशी |
स्वभाव | |||||
वैशिष्ट्ये |
'आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे, आपल्याला सहजतेने पुसता येत नाहीत’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. का ते लिहा. (2)
- पोरांना बसने प्रवास करणे आवडत नाही, कारण ______.
- आपल्याला झाडं लावावी लागतील, कारण ______.
‘‘मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखामावशींसारखे चंदेरी हवेत’’, स्नेहल गहिवरून म्हणाली. अभिषेक भारावून म्हणाला, ‘‘माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये-जा करणार. ठरलं एकदम!’’ ‘‘खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं; पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट’’, अभिषेकचे बाबा म्हणाले. रेखामावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले. ‘‘पाह्यलंत, किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखामावशींनी’’, सुमित म्हणाला. ‘‘पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र, आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्या करता आपल्याला झाडं लावावी लागतील... या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील’’, सुमित भरभरून बोलत होता. ‘‘हो ना, नाही तर आपण तसेच धावत राहू. मळलेल्या पायांची माणसं बनून!’’ पावडेकाका बोलले आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला. |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. स्वमत (3)
पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर आवश्यक आहे. याबाबत तुमचे काय मत आहे.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांडयांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. तो आय. आय. टी. कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला दोन वाजले. “काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता?'' हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामावशी फरशी पुसत होत्या; पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोक्ती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखामावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या. "अवो, स्नेहाताई, मी कुठं एसीत बसूनशान काम करत्ये बाई. शेनामातीत काम करावं लागतं! आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदी धूळ लागती पायास्नी. आन धा-धा मिन्टाला हातपाय धोयाला येळ बी नाय आन पानी तरी कुठं हायबक्कळ?”' "सॉरी, मावशी खरंच सॉरी,'' आपण त्यांच्या मळकट पायाबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसंतरी वाटलं. |
- आकृती पूर्ण करा: (2)
- चौकटी पूर्ण करा: (2)
- दार उघडणारा - ______
- फरशी पुसणाऱ्या - ______
- अभिषेकचा आतेभाऊ - ______
- स्वच्छतेची भोक्ती - ______
- स्वमत:
'सर्वांनी आठवड्यातून एकदातरी सायकलचाच वापर करावा' या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. (3)