Advertisements
Advertisements
'O' केंद्र असलेल्या वर्तुळाला P या बाह्यबिंदूतून AP ही A बिंदूपाशी स्पर्शिका काढली आहे. जर OP = 12 सेमी व ∠OPA = 30°, तर वर्तुळाची त्रिज्या ______ असेल.
Concept: स्पर्शिका - त्रिज्या प्रमेय
'O' केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB व जीवा CD एकरूप आहेत. जर M(कंस AB) = 120°, तर M(कंस CD) काढा.
Concept: कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म
जर sinθ = cosθ, तर θ चे माप किती?
Concept: स्पर्शिका-छेदिका कोनाचे प्रमेय
वरील आकृतीत, m(कंस DXE) = 105°, m(कंस AYC) = 47°, तर ∠DBE चे माप काढा.
Concept: जीवांच्या बाह्यछेदनाचे प्रमेय
वरील आकृतीत जीवा PQ आणि जीवा RS एकमेकींना बिंदू T मध्ये छेदतात. जर ∠STQ = 58° आणि ∠PSR = 24°, तर ∠STQ = `1/2` [m(कंस PR) + m(कंस SQ)] या विधानाचा पडताळा घेण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती:
ΔPTS मध्ये,
∠SPQ = ∠STQ - `square` .......[∵ त्रिकोणाच्या बाहयकोनाचे प्रमेय.]
∴ ∠SPQ = 34°
∴ m(कंस QS) = 2 × `square`° = 68° .......[∵ `square`]
तसेच m(कंस PR) = 2∠PSR = `square`°
∴ `1/2` [m(कंस QS) + m(कंस PR)] = `1/2` × `square`° = 58° .......(I)
परंतु ∠STQ = 58° .........(II) [दिलेले]
∴ `1/2` [m(कंस PR) + m(कंस QS)] = ∠______ ........[(I) व (II) वरून]
Concept: अंतर्लिखित कोनाचे प्रमेय
वरील आकृतीत, C केंद्र असलेल्या वर्तुळाला A या बाह्यबिंदूतून AB आणि AD हे स्पर्शिकाखंड काढले आहेत. तर सिद्ध करा:
∠A = `1/2` [m(कंस BYD) - m(कंस BXD)]
Concept: स्पर्शिका - त्रिज्या प्रमेय
एका वर्तुळाच्या जीवा AB आणि जीवा CD परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू E मध्ये छेदतात. जर AE = 4, EB = 10, CE = 8, तर ED = किती?
Concept: जीवांच्या अंतर्छेदनाचे प्रमेय
एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे. तर त्या वर्तुळातील सर्वात मोठया जीवेची लांबी किती?
Concept: वर्तुळाची संकल्पना
वरील आकृतीत ∠L = 35° असेल, तर
- m(कंस MN) = किती?
- m(कंस MLN) = किती?
उकल:
- ∠L = `1/2` m(कंस MN) ............(अंतर्लिखित कोनाचे प्रमेय)
∴ `square = 1/2` m(कंस MN)
∴ 2 × 35 = m(कंस MN)
∴ m(कंस MN) = `square` - m(कंस MLN) = `square` - m(कंस MN) ...........(कंसाच्या मापाची व्याख्या)
= 360° - 70°
∴ m(कंस MLN) = `square`
Concept: अंतर्लिखित कोनाचे प्रमेय
वरील आकृतिमध्ये दाखविल्याप्रमाणे, ΔABC च्या बाजू BC वरील P बिंदूत एक वर्तुळ बाहेरून स्पर्श करते. वाढवलेल्या रेषा AC व रेषा AB, त्या वर्तुळाला अनुक्रमे बिंदू N व बिंदू M मध्ये स्पर्श करतात. तर सिद्ध करा: AM = `1/2`(ΔABC ची परिमिती)
Concept: स्पर्शिकाखंडाचे प्रमेय
वरील आकृतीमध्ये, ∠ABC हा कंस ABC मधील आंतरलिखित कोन आहे. जर ∠ABC = 60°, तर m∠AOC काढा.
उकल:
∠ABC = `1/2` m(कंस AXC) ...`square`
60° = `1/2` m(कंस AXC)
`square` = m(कंस AXC)
परंतु m∠ AOC = m(कंस `square`) ...(केंद्रीय कोनाचा गुणधर्म)
∴ m ∠AOC = `square`
Concept: स्पर्शिका छेदिका रेषाखंडांचे प्रमेय
O केंद्र असलेल्या वर्तुळाची AB जीवा आहे. AOC वर्तुळाचा व्यास आहे. स्पर्शिका AT वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा.
- ∠CAT व ∠ABC ची मापे काढा व त्याचे कारण लिहा.
- ∠CAT व ∠ABC एकरूप आहेत का? स्पष्टीकरण लिहा.
Concept: वर्तुळाची संकल्पना
3 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळातील सर्वांत मोठ्या जीवेची लांबी किती?
Concept: जीवांच्या अंतर्छेदनाचे प्रमेय
बिंदू O केंद्र घेऊन 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळास P या बाह्यबिंदूतून रेख PA व रेख PB हे स्पर्शिकाखंड असे काढा की ∠APB 70°.
Concept: स्पर्शिकाखंडाचे प्रमेय
पक्ष:
केंद्र P असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB आणि जीवा CD वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू E मध्ये छेदतात.
साध्य:
AE × EB = CE × ED
रचना:
रेख AC आणि रेख BD काढले.
रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा.
सिद्धता:
Δ CAE आणि Δ BDE मध्ये,
∠AEC ≅ ∠DEB ...`square`
`square` ≅ ∠BDE ...(एकाच वर्तुळकंसात अंतर्लिखित कोन)
∴ Δ CAE ~ Δ BDE ...`square`
∴ `square/ ("DE") = ("CE")/square` ...`square`
∴ AE × EB = CE × ED
Concept: जीवांच्या अंतर्छेदनाचे प्रमेय
ΔABC ∼ ΔLMN, ΔABC असा काढा, की AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 4.5 सेमी आणि `"BC"/"MN" = 5/4` तर ΔABC व ΔLMN काढा.
Concept: समरूप त्रिकोणाची रचना
केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा.
Concept: दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग करून.
3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा.
Concept: दिलेल्या वर्तुळाला त्याबाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे.
4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.
Concept: दिलेल्या वर्तुळाला त्याबाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे.
ΔSHR ∼ ΔSVU, ΔSHR मध्ये SH = 4.5 सेमी, HR = 5.2 सेमी, SR = 5.8 सेमी, `"HS"/"SV" = 3/5`, तर ΔSVU काढा.
Concept: समरूप त्रिकोणाची रचना