Advertisements
Advertisements
प्रश्न
एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे.
उत्तर
हॉकी संघांतील एकूण खेळाडू = 6 + 4 + 1 = 11
∴ n(S) = 11
समजा, घटना B : निवडलेला संघनायक हा बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे.
हॉकी संघात 6 बचाव करणारे खेळाडू आहेत.
∴ n(B) = 6
∴ P(B) = `("n"("B"))/("n"("S"))`
∴ P(B) = `6/11`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दोन नाणी एकाच वेळी फेकली असता, दोन्ही नाण्यांवर छाप मिळणे या घटनेची संभाव्यता काढा.
एक नाणे व एक फासा एकाचवेळी फेकले असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.
i) घटना A: काटा व सम संख्या मिळणे.
ii) घटना B: छापा व विषम संख्या मिळणे.
प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे 1 ते 36 या संख्या लिहून तयार केलेली 36 कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर पुढील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा.
i) काढलेल्या कार्डावरील संख्या पूर्ण वर्ग असणे.
ii) काढलेल्या कार्डावरील संख्या मूळ संख्या असणे.
iii) काढलेल्या कार्डावरील संख्या 3 ची विभाज्य संख्या असणे.
दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे.
एक फासा फेकला, तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता _____ असते.
फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
मिळालेला फुगा हिरवा असणे.
एका खोक्यात 5 लाल पेनं, 8 निळी पेनं आणि 3 हिरवी पेनं आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचे आहे, तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा.
एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मीटर व 50 मीटर आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला, तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा.
0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन दोन अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या मूळ असणे.
एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा:
घटना A : छाप व मूळ संख्या मिळणे अशी आहे.