Advertisements
Advertisements
प्रश्न
आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर
प्रस्तावना: इतिहासातील उपलब्ध पुराव्यांचे संशोधनाच्या दृष्टिकोनातून विश्लेषण करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला 'इतिहासलेखन' असे म्हणतात.
आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
१. आधुनिक इतिहासलेखन पद्धती ही शास्त्रशुद्ध असून तिची सुरुवात प्रश्नांची योग्य मांडणी करण्यापासून होते.
२. हे प्रश्न भूतकाळातील विविध मानवी समाजातील लोकांनी विशिष्ट काळात केलेल्या कृतीविषयी असल्याने ते मानवकेंद्रित असतात. या कृतींचा संबंध देवदेवतांच्या कथा किंवा दैवी घटना यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न या इतिहासामध्ये केला जात नाही.
३. मांडलेल्या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वसनीय पुराव्यांचा आधार असल्याने इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते.
४. इतिहासामधील मानवाच्या वाटचालीचा वेध घेण्यासाठी भूतकाळात मानवाने केलेल्या कृतींचा आधार घेतला जातो.
निष्कर्ष: अशारीतीने, आधुनिक इतिहासलेखनामध्ये शास्त्रशुद्धता आणि तर्कसुसंगता असल्याचे दिसून येते.