Advertisements
Advertisements
प्रश्न
आधुनिक काळात राज्याची भूमिका स्पष्ट करा.
- शासन
- आर्थिक प्रगती
- लोककल्याण
- राष्ट्र उभारणी
- शांतता व सुव्यवस्था
दीर्घउत्तर
उत्तर
राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यांसारखी मूल्ये तसेच आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांसारखी उद्दिष्टे राज्याची भूमिका स्पष्ट करतात. ही भूमिका खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते.
- शासन: समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमधील सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे. यालाच ‘लोकशाहीकरण’ अथवा ‘लोकसहभागी राज्य’ असे म्हणतात.
- आर्थिक प्रगती: देशाच्या औद्योगिक, कृषी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्याने महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. आर्थिक स्थैर्य आणि वाढ यांतून लोकांचे आर्थिक हित साध्य करता येते. याचा अर्थ समाजवादी व्यवस्था निर्माण करणे नव्हे, तर राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे होय.
- लोककल्याण: सामाजिक न्याय, वाजवीपणा (fairness), समानता या तत्त्वांचा वापर लोककल्याणासाठी करणे, समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे ही राज्याची जबाबदारी आहे.
- राष्ट्र उभारणी: समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्याने घ्यायची असते. राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध आहे.
- शांतता आणि सुव्यवस्था: राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. राज्याचा मूळ हेतू देशाचे संरक्षण हा आहे. या कार्याला ‘राष्ट्र उभारणीचे’ कार्य असे संबोधले जाते. राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय वा देशांतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. देशाचे संरक्षण करणे, अस्तित्व टिकवणे, संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकवणे यांत राज्याची प्रमुख भूमिका असते.
shaalaa.com
राज्याची भूमिका
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?