Advertisements
Advertisements
प्रश्न
अभिव्यक्ती.
संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना ‘सोयरी’ असे म्हटले आहे, यामागील तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
उत्तर
थोडा वेळ बागेत बसले, रानात फेरफटका मारला की, मनाला खूप आल्हाद मिळतो. शहरात आखीव रेखीव रस्ते आणि तशाच आखीव रेखीव इमारती. इमारतीतल्या प्रत्येक घराचा चेहरा सारखाच. याउलट, रानावनात सौंदर्याची मुक्त उधळण असते. तिथे एक झाड दुसऱ्या झाडासारखे नसते. एक पान दुसऱ्या पानासारखे नसते. एक हिरवा रंग पाहा. त्या एका हिरव्या रंगांच्या शेकडो छटांचे दर्शन तिथे घडते. हजारो आकार, हजारो रंग, हजारो आवाज, हजारो गंध. तिथे पंचेद्रियांच्या सुखाची लयलूट असते. किती विविधता! पक्षी, प्राणी, किडेमुंग्या यांच्या हजारो जाती. त्यांच्यातही रंग, आकार, हालचाली यांचे हजारो प्रकार. निसर्गातली ही विविधता मनाला मोहवते. मन त्या सौंदर्यात बुडून जाते. कृत्रिमतेची चढलेली पुटे हळूहळू गळून पडतात. मन मोकळे होते. सौंदर्याचा, आनंदाचा अनुभव घेऊ लागते.
तुकाराम महाराजांनी विठ्ठलभक्तीसाठी वनाचाच आश्रय घेतला. माणसात असलेल्या सर्व कुभावनांपासून मुक्ती मिळावी; आपला आत्मा त्या कुभावनांपासून मुक्त व्हावा; ईश्वराचे निर्मळ, सोज्वळ रूप दिसावे; त्याच्याशी एकरूप होता यावे; म्हणून त्यांनी वन गाठले. वनात गेले की मन आपसूक मुक्त होते. मनाची ही अवस्था ईश्वराकडे जाण्यासाठी उत्तम अवस्था. वनाचे सौंदर्य म्हणजे ईश्वराचे एक रूपच, त्या रूपाच्या सान्निध्यात राहावे, षड्रिपू चा त्याग करावा म्हणजे आपण अलगद ईश्वराच्या जवळ जाऊन ठेपतो. आपल्याला सर्व सुंदर, निर्मळ, चांगलेच दिसते. या चांगुलपणाचाच आस्वाद घेत राहावा, असे वाटू लागते. म्हणजे ईश्वराच्या दर्शनातच, त्याच्या स्मरणातच आकंठ बुडून जावे अशी अवस्था होऊन जाते. तुकाराम महाराजांना वृक्षवल्ली सोयरी वाटली ती या कारणाने. या वृक्षवल्लींच्या ठायी माणसाचे दुर्गुण नसतात. ती ईश्वराची रूपे होत. त्यांच्या सहवासातच ईश्वरभक्ती फुलते. वृक्षवल्ली, सर्व वनश्री आपल्याला ईश्वराच्या वाटेवर आणून सोडतात. तुकाराम महाराज म्हणूनच वृक्षवल्लींच्या सान्निध्यात गेले. वृक्षवल्लींना सोयरी' मानले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृती करा.
उत्तररात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये
कृती करा.
घाणेरीच्या फुलांची वैशिष्ट्ये
कृती करा.
चाफ्याच्या फुलांची वैशिष्ट्ये
कृती करा.
उत्तररात्रीच्या वेळी खिडकीतून बाहेर पाहताना फुलांविषयी लेखकाच्या मनात निर्माण होणारे प्रशन
कारणे शोधा व लिहा.
पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो, कारण...
पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
सायली -
पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
गुलमोहोर -
पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.
चाफा -
वर्णन करा.
उत्तररात्रीचे आगमन
वर्णन करा.
पहाट व पाखरे यांच्यातील नात
खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.
वृक्ष-
खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.
फुले-
खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.
पाखरे-
स्वमत.
‘मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे, ती या आदिम, ॠजु, स्नेहबंधांमुळे तर नाही?...’ या विधानासंबंधी तुमचे मत लिहा.
स्वमत.
‘रेशीमबंध’ या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.
अभिव्यक्ती.
निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे (२)
(य) ______
(र) ______
(२) लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव (२)
(य) ______
(र) ______
सर्वांत आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत ‘काय लिहावं?’ याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो, त्या वेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहोराच्या घरट्यांतून, जॅक्रांडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाशकिरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. ‘पहाट झालीय काय?’ असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते, की ‘मी येऊ का तुम्हांला भेटायला?’ पहाटेचं नि या इवल्या इवल्या पाखरांचंदेखील असंच काहीसं जवळकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाटदेखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली, की पहाटेलादेखील राहावत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते. इतकं हळुवार, की तुम्हांला त्याची गंधवार्तादेखील लागू नये! पहाट कशी होते, हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा म्हणजे तुम्हांलाही त्यातला आल्हाद जाणवेल. त्यातली तरलता जाणवेल. त्यातली नजाकत जाणवेल. हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जॅक्रांडावरची नि गुलमोहोरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो; पण जसजशी पहाट उजाडते, तसतसा तो वाढत जातो. |
(३) स्वमत अभिव्यक्ति: (४)
पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने वर्णन केलेले नाते तुमच्या शब्दांत लिहा.
किंवा
‘तुम्ही अनुभवलेली पहाट’ तुमच्या शब्दांत वर्णन करा.