मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

वर्णन करा. पहाट व पाखरे यांच्यातील नात - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

वर्णन करा.

पहाट व पाखरे यांच्यातील नात

टीपा लिहा

उत्तर

लेखकांना भोवतालचा निसर्ग माणसासारखाच भावभावनांनी भरलेला भासतो. पहाटेची घटना तशी साधीशीच. पहाट होत आहे. पाखरांचा बारीक बारीक आवाज सुरू झाला आहे. त्यांच्या हालचालींना सुरुवात होत आहे. पहाट हळूहळू पुढे सरकत आहे. या प्रसंगात लेखकांना मानवी भावभावनांचे दर्शन घडते. पाखरांचा बारीक बारीक आवाज म्हणजे त्यांची कुजबुज होय. ती जणू एकमेकांना विचारताहेत, " पहाट आली का? " पहाटेचे हळुवार येणे पाहून लेखकांना वाटते की, पाखरांना त्रास होऊ नये म्हणूनच जणू पहाट हळूच पाखरांना विचारते की, "मी येऊ का?" त्या दोघांमधले हळुवार कोमल नातेच लेखकांना या वाक्यातून व्यक्त करायचे आहे.

shaalaa.com
रेशीमबंध
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.08: रेशीमबंध - कृती (३) [पृष्ठ ३८]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 2.08 रेशीमबंध
कृती (३) | Q 2.2 | पृष्ठ ३८

संबंधित प्रश्‍न

कृती करा.

उत्तररात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये


कृती करा.

घाणेरीच्या फुलांची वैशिष्ट्ये


कृती करा.

चाफ्याच्या फुलांची वैशिष्ट्ये


कृती करा.

उत्तररात्रीच्या वेळी खिडकीतून बाहेर पाहताना फुलांविषयी लेखकाच्या मनात निर्माण होणारे प्रशन


कारणे शोधा व लिहा.

पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो, कारण...


पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.

सायली -


पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.

गुलमोहोर -


पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.

जॅक्रांडा -


पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.

चाफा -


खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.

वृक्ष-


खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.

फुले-


खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.

वेली-


खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.

पाखरे-


स्वमत.

‘रेशीमबंध’ या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.


अभिव्यक्ती.

निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

डॉ. यू. म. पठाण यांच्या लेखनाची भाषिक वैशिष्ट्ये पाठाधारे स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना ‘सोयरी’ असे म्हटले आहे, यामागील तुम्हांला समजलेली कारणे लिहा.


खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे (२)

(य) ______

(र) ______

(२) लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव (२)

(य) ______

(र) ______

          सर्वांत आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत ‘काय लिहावं?’ याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो, त्या वेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहोराच्या घरट्यांतून, जॅक्रांडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाशकिरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. ‘पहाट झालीय काय?’ असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते, की ‘मी येऊ का तुम्हांला भेटायला?’  पहाटेचं नि या इवल्या इवल्या पाखरांचंदेखील असंच काहीसं जवळकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाटदेखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली, की पहाटेलादेखील राहावत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते. इतकं हळुवार, की तुम्हांला त्याची गंधवार्तादेखील लागू नये! पहाट कशी होते, हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा म्हणजे तुम्हांलाही त्यातला आल्हाद जाणवेल. त्यातली तरलता जाणवेल. त्यातली नजाकत जाणवेल.

          हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जॅक्रांडावरची नि गुलमोहोरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो; पण जसजशी पहाट उजाडते, तसतसा तो वाढत जातो.

(३) स्वमत अभिव्यक्ति: (४)

पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने वर्णन केलेले नाते तुमच्या शब्दांत लिहा.

किंवा

‘तुम्ही अनुभवलेली पहाट’ तुमच्या शब्दांत वर्णन करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×