मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

अहवालाचे स्वरूप व आवश्यकता स्पष्ट करा. हेतू, तारीख वेळ, समारोप विविध मुद्दे ______ आरंभ ते शेवट ______ क्रमाक्रमाने तपशील ______ माहिती संकलन ______ अहवाललेखनाची आवश्यकता. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

अहवालाचे स्वरूप व आवश्यकता स्पष्ट करा.

हेतू, तारीख वेळ, समारोप विविध मुद्दे ______ आरंभ ते शेवट ______ क्रमाक्रमाने तपशील ______ माहिती संकलन ______ अहवाललेखनाची आवश्यकता.

दीर्घउत्तर

उत्तर

  1. हेतू, तारीख, वेळ, समारोप विविध मुद्दे: एखाद्या कार्यालयात, संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची, समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे ‘अहवाल लेखन’ होय. ही नोंद करताना त्यात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, प्रतिसाद, समारोप अशा विविध मुद्‌द्यांचा समावेश केलेला असतो.
  2. आरंभ ते शेवट: कार्यक्रम, समारंभ प्रत्यक्षात सुरू झाल्यापासून ते थेट तो समारंभ, कार्यक्रम संपेपर्यंत आवश्यक तेवढ्या तपशिलांसह लेखी नोंद अहवालात केली जाते. 
  3. क्रमाक्रमाने तपशील: अहवालाची माहिती क्रमाक्रमाने सादर केली जावी, जेणेकरून वाचकाला सहज समजू शकेल. समारंभ, कार्यक्रम संपेपर्यंत क्रमाक्रमाने कसा पूर्ण होत गेला याची आवश्यक तेवढ्या तपशिलांसह लेखी नोंद अहवालात केली जाते. 
  4. माहिती संकलन: एखाद्या विषयातील समस्येच्या संबंधाने माहितीच्या संकलनाचे, सर्वेक्षणाचे, विशिष्ट विषयासंबंधी नेमलेल्या आयोगाचे अहवाल असतात. तसेच प्रगती अहवाल, तपासणी अहवाल, चौकशी अहवाल, आढावा अहवाल, मासिक अहवाल आणि वार्षिक अहवाल अशा स्वरूपाचे अनेकविध अहवाल असतात.
  5. अहवाललेखनाची आवश्यकता: कार्यक्रमांच्या, समारंभांच्या नोंदी ठेवल्या नाहीत तर भविष्यकाळात संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळवण्यात अडचणी येतात. तसे होऊ नये यासाठी अहवाल लिहिणे आवश्यक ठरते. भविष्यकालीन नियोजनासाठीही अहवाल आवश्यक असतात. विविध संस्था, लघुउद्योग ते मोठमोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखाद्या समस्येच्या संदर्भात योग्य निर्णय घ्यायचा असेल, सार्वजनिक क्षेत्रात एखादा महत्त्वाकांक्षी उद्योग किंवा उपक्रम सुरू करायचा असेल तर अगोदर त्या संदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे आवश्यक असते.
shaalaa.com
अहवाल
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्‍न

अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दांत लिहा.


अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा.


वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे, हे विधान स्पष्ट करा.


अहवाललेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा:
वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता.


अहवाललेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा:
शब्दमर्यादा.


अहवाललेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा:
नि:पक्षपातीपणा.


अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या दोन बाबी सोदाहरण स्पष्ट करा.


पुढील विषयांवर अहवालाचे लेखन करा :
तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन.


पुढील विषयांवर अहवालाचे लेखन करा:

तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रम.


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘अहवाल लेखनाची वैशिष्टये’ विशद करा:

अहवाल म्हणजे ______ सुस्पष्टता वस्तुनिष्ठता ______ विश्वसनीयता ______ विविध क्षेत्रांतील गरज.


अहवाललेखनाची कोणतीही दोन वैशिष्टये लिहा.


तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी अहवाललेखन करा.

अहवालाचा उद्देश ______ अहवाल लेखनात सुस्पष्टता व नीटनेटकेपणा ______ वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी वस्तुनिष्ठता ______ त्यात विश्वसनीयता ______ कार्यक्रमाच्या प्रत्येक बिंदूला आवर्जून घेणे.


अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी लिहा.


अहवाल लेखनाची उपयुक्तता लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे अहवालाची प्रमुख अंगे स्पष्ट करा.

प्रास्ताविक ______ अहवालाचा मध्य ______ अहवालाचा शेवट ______ अहवालाची भाषा ______ अहवालाची आवश्यकता.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×