Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विषयांवर अहवालाचे लेखन करा :
तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन.
उत्तर
चेतना कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय
नागपूर
वार्षिक स्नेहसंमेलन २०१९ - २०२०
अहवाल
शनिवार, दिनांक ४ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात सन २०१९ - २०२० या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.
समारंभाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गणेश दिघे यांनी भूषवले होते. सुप्रसिद्ध डबिंग कलाकार श्रीमती कार्तिकी दाते या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. स्नेहसंमेलनास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व अध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा आरंभ 'तू बुद्धी दे, तू तेज दे' या प्रार्थनेने करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेतील मोहिनी काळे या विद्यार्थिनीच्या सुमधुर गीताने सर्वांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रा. कुमार दाढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. समारंभात सादर होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी सांगितली. प्रा. दीप्ती राणे यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.
सर्वांच्या सत्कारानंतर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश देशपांडे यांनी सन २०१९ - २०२० या शैक्षणिक वर्षातील कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्रीडाविषयक घडामोडींचा थोडक्यात आढावा घेतला. सर्व अध्यापकांच्या कामाचे आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावी (अ) मधील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शाखांमधील निवडक विद्यार्थ्यांना मिळून राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित नाटिका सादर केली. लागोपाठ समूह नृत्य आणि एकल गीत गायन मिळून चार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध डबिंग कलाकार श्रीमती कार्तिकी दाते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डबिंग क्षेत्रातील संधी समजावून सांगितल्या. संभाषण कौशल्यासोबत वाचनाचे महत्त्वही सांगितले. प्रात्यक्षिकांच्या साहाय्याने आवाजातील वैविध्य विद्यार्थ्यांना दाखवले.
यानंतर उच्च माध्यमिक परीक्षेत सर्वांत अधिक गुण मिळवून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये महाविद्यालयाची नाममुद्रा उमटवणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन कौतुक करण्यात आले होते. वादविवाद, कवितावाचन, वक्तृत्व, निबंध, टी-शर्ट पेंटिंग या स्पर्धांची पारितोषिके अनुक्रमे वितरीत करण्यात आली. दरवर्षी स्नेहसंमेलनात सर्वांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाचा 'आदर्श विद्यार्थी पुरस्कार'. बारावी (अ) कला शाखेच्या कपिल बोरसे या विद्यार्थ्यांना २०१९ - २०२० या वर्षातील 'आदर्श विद्यार्थी पुरस्कार' देण्यात आला. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.
अध्यक्षीय भाषणात मा. श्री. गणेश दिघे यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या महाविद्यालयीन जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा दिला. शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रत असणारी मायेची भावना सांगितली. सामाजिक कार्यातील अनेक उदाहरणे सांगून विद्यार्थ्यांना सदय सामाजिक प्रश्नांची जाणीव करून दिली. पारितोषिक प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पारितोषिक प्राप्त विदयार्थ्यांच्या यादीचे वाचन विद्यार्थी प्रतिनिधी मंदार भावे आणि अश्विनी भोसले यांनी केले. प्रा. माणिक कढे यांनी सर्वांचे आभार मानले. तीन तास रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
प्रा. दीप्ती राणे
अर्थशास्त्र विभागप्रमुख
दि. ……… सचिव अध्यक्ष
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दांत लिहा.
अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा.
वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे, हे विधान स्पष्ट करा.
अहवाललेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा:
वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता.
अहवाललेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा:
शब्दमर्यादा.
अहवाललेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा:
नि:पक्षपातीपणा.
अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या दोन बाबी सोदाहरण स्पष्ट करा.
पुढील विषयांवर अहवालाचे लेखन करा:
तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रम.
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘अहवाल लेखनाची वैशिष्टये’ विशद करा:
अहवाल म्हणजे ______ सुस्पष्टता वस्तुनिष्ठता ______ विश्वसनीयता ______ विविध क्षेत्रांतील गरज.
अहवाललेखनाची कोणतीही दोन वैशिष्टये लिहा.
तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी अहवाललेखन करा.
अहवालाचा उद्देश ______ अहवाल लेखनात सुस्पष्टता व नीटनेटकेपणा ______ वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी वस्तुनिष्ठता ______ त्यात विश्वसनीयता ______ कार्यक्रमाच्या प्रत्येक बिंदूला आवर्जून घेणे.
अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी लिहा.
अहवाल लेखनाची उपयुक्तता लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे अहवालाची प्रमुख अंगे स्पष्ट करा.
प्रास्ताविक ______ अहवालाचा मध्य ______ अहवालाचा शेवट ______ अहवालाची भाषा ______ अहवालाची आवश्यकता.
अहवालाचे स्वरूप व आवश्यकता स्पष्ट करा.
हेतू, तारीख वेळ, समारोप विविध मुद्दे ______ आरंभ ते शेवट ______ क्रमाक्रमाने तपशील ______ माहिती संकलन ______ अहवाललेखनाची आवश्यकता.